More than 50 percent of the cigarette pulls out to look cool
50 टक्क्यांहून अधिक तरुण 'कूल' दिसण्यासाठी ओढतात सिगारेट By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 2:45 PM1 / 4देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. 2 / 4एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे. तर 90 टक्के तरुणांनी सांगितलं आहे की, जर त्यांच्या आई-वडिलांनी धुम्रपानास विरोध केला नाही तर ते धुम्रपान करणं सुरु ठेवतील.3 / 480 टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहे.4 / 4सर्व्हेत सहभागी झालेल्या 75 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कधी त्यांचे मित्र सिगारेट पिण्यासाठी आग्रह करतात, तेव्हा त्यांना नकार देणं कठीण जातं. 46 टक्के विद्यार्थ्यांनी तर आपण मित्रांमध्ये कूल दिसावं यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्याचं कबूल केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications