शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख रुग्ण, ३.४५ लाख ऑक्सिजन बेड्सची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 1:27 PM

1 / 9
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या टास्क फोर्सनं तिसऱ्या लाटेतील परिस्थिती हाताळण्यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे.
2 / 9
सुत्रांच्या माहितीनुसार, टास्क फोर्सनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट आल्यास दिवसाला तब्बल ६ लाख २१ हजार रुग्ण आढळू शकतात. दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा ४ लाख १४ हजारांपर्यंत पोहोचला होता.
3 / 9
याशिवाय, कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेत देशात एका दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या १ कोटींच्या घरात पोहोचू शकते. अशा परिस्थितीवेळी कोणकोणत्या वैद्यकीय सुविधांची गरज भासेल याची पूर्वनियोजित तयारी करण्यास टास्क फोर्सनं सुरुवात केली आहे.
4 / 9
टास्क फोर्सनं तयार केलेल्या रोड मॅपनुसार १ कोटी सक्रिय रुग्णांपैकी २३ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते. यानुसार जवळपास ६९ हजार जणांना आयसीयू बेड्स आणि ३ लाख ४५ हजार जणांना ऑक्सिजन बेड्सची गरज भासेल.
5 / 9
सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या देशात ७५ हजार ८६७ आयसीयू बेड्स आहेत. तर देशात सध्या २ लाख ५५ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. याशिवाय देशात सध्या ४ लाख ९५ हजार आयसोलेशन बेड्स देखील उपलब्ध आहेत.
6 / 9
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परिस्थिती आणखी बिकट झाली तर जवळपास ९० हजार ऑक्सिजन बेड्सची कमतरता देशात भासू शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी देखील सरकारनं आकडेवारी जाहीर केली केली होती. तरीही देशात ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासली होती.
7 / 9
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सरकारी पातळीवर तयारी केली जात असली तरी ऐनवेळी नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अचूक अंदाज व्यक्त करणं कठीण आहे. दुसऱ्या लाटेत १५ ते २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली होती. तरीही रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नव्हते.
8 / 9
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी सरकारनं २५०० कोटी रुपयांच्या कोरोना लस खरेदीची तयारी देखील सुरू केली आहे.
9 / 9
जास्तीत जास्त वेगानं लसीकरण करणं हाच एक रामबाण उपाय सध्या सरकारसमोर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस