Mouth Smell : Home remedies for bad breath mouth freshener drink water and many more
Mouth Smell : तोंडाच्या दुर्गंधीमुळे दूर पळू लागतात लोक? लगेच करा हे ५ घरगुती उपाय; मग बघा कमाल... By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:38 AM1 / 7Mouth Smell : अनेकदा तुमच्या लक्षात आलं असेल की, सकाळी तोंडाची दुर्गंधी येत असते. सकाळी असं होतं कारण रात्रभर तोंडात भरपूर बॅक्टेरिया जमा होतात. ज्या कारणाने तोंडाची दुर्गंधी येऊ लागते. यामुळे केवळ रिलेशनशिपवरच नाही तर जवळचे लोकही दूर पळू लागतात. चारचौघात लाजीरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो.2 / 7तोंडाची दुर्गंधी येत असल्याने तुमच्या पार्टनरला त्रास होतो, त्यांचा मूड खराब होतो. इतकंच नाही तर स्वत:साठीही हे चांगलं नसतं. त्यामुळे ही तोंडाची दुर्गंधी दूर करण्यावर लक्ष द्यावं लागतं. ही दुर्गंधी दूर कऱण्यासाठी अनेकजण माऊथ फ्रेशनरचा वापर करतात. पण बाहेरचं काही वापरण्यापेक्षा घरातीलच काही पदार्थांनी तुम्ही तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. घरीच तुम्ही काही माऊथ फ्रेशनर तयार करून ही समस्या दूर करू शकता.3 / 7१) मिठाच्या पाण्याचा गुरळा - फक्त सकाळीच नाही तर इतरवेळीही तोंडाची दुर्गंधी येत असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने गुरळा करून शकता. याने होतं असं की, तोंडातील बॅक्टेरियाची ग्रोथ थांबते आणि ते बाहेर निघून जातात. तोंड फ्रेश होतं आणि दुर्गंधी गायब होते.4 / 7२) लवंग चघळा - लवंगचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी करत असतो. मात्र, याचा वापर तुम्ही तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही केली जाऊ शकते. लवंगमध्ये अनेक औषधी गूण असतात. ज्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. तोंड फ्रेश होतं.5 / 7 ३) भरपूर पाणी प्या - तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणं हा एक चांगला उपाय आहे. याने जास्तीत जास्त बॅक्टेरिया बाहेर येतात आणि त्यांची संख्याही कमी होते. चांगल्या रिझल्टसाठी पाण्यात तुम्ही थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात.6 / 7४) दालचीनी चघळा - दालचीनीच्या वापर साधारण प्रत्येक घरात वेगवेगळ्या पदार्थांमधून केला जातो. मसल्यातील हा एक महत्वाचा पदार्थ आहे. याचा आयुर्वेदातही मोठा वापर केला जातो. अशात तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचीनीचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळा. याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.7 / 7५) लिंबू - लिंबात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आढळून येतात. लिंबू हे एक आंबट फळ आहे. ज्याच्या माध्यमातून व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण केली जाते. लिंबाचा रस तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो. लिंबू पाणी पिऊन किंवा या पाण्याने गुरळा करून तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications