शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भय इथले संपत नाही! 'या' राज्यात पसरतोय रहस्यमय आजार; ३०० रुग्णांना लागण, एकाचा मृत्यू

By manali.bagul | Published: December 07, 2020 11:32 AM

1 / 7
आंध्र प्रदेशातील एलरूमध्ये एक रहस्यमय आजार पसरल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. रविवारी रात्री या रहस्यमय आजारानेबाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली.
2 / 7
गेल्या दोन दिवसात या रहस्यमय आजारामुळे ७६ लोकांना रुग्णांलयात दाखल करावं लागलं असून या रहस्यमय आजाराने बाधित असलेल्या संख्या ३५० वर पोहोचली आहे. आतापर्यंत १८६ लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे.
3 / 7
१६४ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हेत. अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजारानं डॉक्टरही चक्रावले आहेत.
4 / 7
स्थानिक प्रशासनाने या अज्ञान आजाराचा प्रकोप लक्षात घेता एलुरूच्या सर्व शैक्षणिक संस्थाना सुटट्टी घोषित केली आहे.
5 / 7
मंगलगिरी एम्स के डॉक्टर आणि नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशियन हैदराबाद येथील तज्ज्ञांच्या गटाने रासायनीक पद्धतीने पाण्याचे नमुने एकत्र करण्याासाठी एक टीम एलुरूला पाठवली आहे. या टीमकडून आजाराबाबत अधिक माहिती घेतली जाणार आहे.
6 / 7
मुख्यमंत्री आपल्या कँप कार्यालयातून सकाळी ९:३० ला निघतील आणि १०:३० ला एलुरूच्या सरकारी रुग्णालयात पोहोचतील. रुग्णालय. प्रशासनाशी चर्चा करून आजाराच्या उपचारांबाबत अधिक चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारीवर्गासह भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.
7 / 7
आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयवाडा आणि विशाखापट्टनमच्या लॅबमध्ये रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सेरेब्रल-स्पायनल फ्लुएड सॅम्पल रिपोर्ट आल्यानंतर या आजाराबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होईल. तज्ज्ञांकडून हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण तर दुधाद्वारे केमिकल पॉयजनिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली जात आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य