शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Doctor's Day : कसे बनाल स्वत:चे डॉक्टर, निरोगी राहण्यासाठी लावा 'या' १० सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 4:46 PM

1 / 11
दरवर्षी १ जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश डॉक्टर्सचे आभार व्यक्त करण्यासोबतच लोकांना चांगल्या आरोग्यासाठी जागरूक करणं हाही आहे. लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून तुम्ही स्वत:चे डॉक्टर बनू शकता. चला जाणून घेऊ एक चांगली लाइफस्टाईल अंगीकारण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी लावून घेतल्या पाहिजे.
2 / 11
सकाळी लवकर उठा - सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांचा दिवस चांगला जातो. सकाळी लवकर उठल्याने पचन तंत्र चांगलं राहतं आणि तुम्हाला मानसिक रूपानेही आराम मिळतो.
3 / 11
कोमट पाणी प्या - रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्या. याने मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने घशासंबंधी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकलात तर पोट साफ राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यासही याची मदत होते.
4 / 11
एक्सरसाइज करा - सकाळी उठल्यावर पाणी पिल्यावर योग किंवा एक्सरसाइज करण्याची सवय लावा. याने तुम्ही दिवसभर ताजेतवाणे आणि फ्रेश रहाल. याने दिवसाची सुरूवात सकारात्मक पद्धतीने होते. एक्सरसाइज केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि सोबतच इम्यूनिटीही बूस्ट होते. वेगवेगळे आजारही तुमच्यापासून दूर राहतात.
5 / 11
मोड आलेले कडधान्य खा - सकाळी नाश्ता आवर्जून करा. नाश्त्यात मोड आलेले धान्य खा. हे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. यात अॅंटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर असतात. यात फायबरही मोठ्या प्रमाणात असतं. याने पचन तंत्र मजबूत होतं आणि इम्यूनिटीही बूस्ट होते.
6 / 11
बाहेरचं खाणं टाळा - जेवढं शक्य असेल जंक फूड खाणं सोडा. बाहेरच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि तेल असतं, ज्याने तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. बाहेरचं खाल्ल्याने संक्रमणाचा धोकाही राहतो. त्यासोबतच जुलाब, एसिडिटी आणि पोटदुखी अशाही समस्या होतात.
7 / 11
भरपूर पाणी प्या - शरीर फिट आणि निरोगी ठेवायचं असेल त भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. उन्हाळ्यात जास्त पाणी पिऊन तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचता. जास्त पाणी प्यायल्याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्याने ऑक्सीजन आणि न्यूट्रिएंट्स शरीरात चांगल्याप्रकारे पोहोचतात. पाणी प्यायल्याने मांसपेशीमध्ये तणाव आणि सांधेदुखीची समस्या कमी होते.
8 / 11
जास्त गोड आणि मिठापासून अंतर ठेवा - जास्त गोड आणि मीठ असलेले पदार्थ खाऊ नका. जास्त गोड आणि मीठ शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस आणि मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशरची समस्या होते. जास्त मिठाने हृदयासंबंधी आजारही होतात.
9 / 11
सिगारेट आणि मद्यसेवन बंद करा - सिगारेट आणि मद्यसेवनापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सिगारेट आणि दारूने इम्यूनिटी कमजोर होते. तुम्ही लवकर आजारी पडण्याची शक्यता वाढते. सिगारेटने फुप्फुसं खराब होतात.
10 / 11
आनंदी रहा - दिवसाची सुरूवात हसत-खेळत करा. विनाकारण तणाव घेऊ नका. तणाव घेतल्याने तुम्हाला अनेक आजार होतील. डॉक्टरही आजारांना दूर ठेवण्यासाठी आनंदी राहण्याचा सल्ला देतात. अनेक रिसर्चनुसार, तणाव न घेणारा व्यक्ती जास्त काळ जगतो.
11 / 11
पुरेशी झोप घ्या - हेल्दी लाइफस्टाईलसाठी गरजेचं आहे की, तुम्ही वेळेवर झोपावं आणि पुरेशी झोप घ्यावी. चांगली झोप घेतल्याने तुम्ही ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल आणि डिप्रेशनसारख्या समस्यांपासून दूर रहाल. पुरेशी झोप घेतल्याने शरीर फ्रेश आणि अॅक्टिव राहतं. ज्याने दिवसाची सुरूवात चांगल्याप्रकारे करण्यास मदत मिळते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स