natural and effective home remedies to get relieve from constipation and acidity
अॅसिडिटीमुळे आहात हैराण? करा हे घरगुती उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 2:52 PM1 / 7आल्यामध्ये व्होलाटाईल ऑईल असतं ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होत नाही. पाण्यामध्ये आले उकळावे आणि ते पाणी प्यावे. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. 2 / 7अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावे आणि पाणी देखील प्यावे. यामुळे पोटाच्या समस्या सुटण्यास मदत होते. 3 / 7जेवणानंतर बडीशेप चावून खावी. शिवाय, पाण्यासोबतही याचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे पोटात होणारी जळजळ शांत होण्यास मदत मिळते.4 / 7फायबर्सचा उत्तम स्त्रोत म्हणून केळ्याकडे पाहिले जाते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास केळ्याचे सेवन वाढवावे.5 / 7पदार्थ योग्यरित्या चावून न खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होतो. शिवाय, यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो. यामुळे हळू आणि योग्य पद्धतीनं चावून खास खाल्ला पाहिजे. 6 / 7कधी-कधी ताणतणावामुळेही पचनक्रियेवर परिणाम होतो. ताणतणावापासून मुक्ती मिळावी यासाठी योग, व्यायाम केला पाहिजे.7 / 7खाताना थंड पाण्याचे सेवने करणं ही सवय आरोग्यास हानिकारक आहे. जेवण पूर्ण झाल्यानंतरच पाणी प्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications