शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रिटननंतर आता जर्मनीत सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आधीच्या स्ट्रेनपेक्षाही अधिक जीवघेणा ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 1:37 PM

1 / 7
ब्रिटन आणि नायजेरियानंतर आता जर्मनीतीही कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन पसरल्यानं लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन कितपत संक्रामक आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही. दक्षिण जर्मनीत आढळून आलेल्या या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे आतापर्यंत ३५ लोकांमध्ये संक्रमण पसरलं आहे. आतापर्यंत कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनला कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही.
2 / 7
दक्षिण जर्मनीतील बावरियामधील गार्मिश पार्टेनकर्शेन क्लिनिकमधील निर्देशक प्रँक नीडरबुक यांनी जर्मन मीडिया संस्थान डायचे वेलेशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत या नवीन स्ट्रेनच्या संक्रामकतेबाबत माहिती मिळालेली नाही. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असू शकतो. या व्हायरसच्या जीनोम सिक्वेन्सवर सध्या अभ्यास केला जात आहे.
3 / 7
मेडिकल डायरेक्टर क्लिमेंस स्टॉक्लॉसनर यांनी सांगितले की, ''सध्या घाबरण्याचे काहीही कारण नाही. आपल्याला जीनोम सिंक्वेंसिंगचे परिणाम येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या म्यूटेड कोरोना व्हायरसचा क्लिनिकल रिलेवंस पाहिला जाणार आहे. या व्हायरसचा स्ट्रेन कितपत संक्रामक आहे. तसंच या व्हायरसमुळे आधीच्या कोरोना व्हायरसवर कसा परिणाम होईल याबाबत अधिक माहिती घेतली जाणार आहे. ''
4 / 7
कोरोनाच्या नवीन स्ट्रेननं संक्रमित असलेल्या लोकांच्या नमुन्यांची चाचणी करून बर्लिनच्या शैराईट रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. क्लिमेंस स्टॉक्लॉसनरने सांगितले की, ''ब्रिटन आणि नायजेरियामध्ये कोरोना व्हायरसचे वेरिएंट आणि जर्मनीतील कोरोना व्हायरसचे वेरिएंट वेगळे आहेत. आतापर्यंत या व्हायरसच्या संक्रमणामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. तरी हा व्हायरस अधिक संक्रामक असू शकतो.''
5 / 7
जगभरातील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे वेगवेगळे वेरिएंट्स समोर यायला सुरूवात झाली आहे. कोरोना व्हायरसची लस या नवीन वेरिएंट्सवर परिणामकारक ठरत नसल्याचे सांगितले जात आहे. जर्मनीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट दिसून आली होती.
6 / 7
जर्मनीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गोष्टीवर जोर दिला जात आहे की, अनेक लोक परदेशातून येत आहे. त्यांना वेळीच रोखणं गरजेचं आहे.
7 / 7
कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या जाळ्यात लोकांनी अडकू नये साठी प्रयत्न केले जात आहेत. रॉबर्ट कोच इंस्टिट्यूटमधील तज्ज्ञांच्यामते जर्मनीमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये वाढ झालेली दिसून आली होती. जर्मनीतील प्रशासनाकडून नवीन स्ट्रेनचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस