New disease brucellosis from china among corona so many people infected know symptoms
भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग By manali.bagul | Published: September 21, 2020 11:18 AM1 / 9जगभरात कोरोनाच्या माहामारीमुळे करोडो लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये नवीन एका आजाराने हाहाकार निर्माण केला आहे. हा आजार बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे पसरला आहे. 2 / 9गांसु प्रांतांची राजधानी लान्चो येथील आरोग्य आयोगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारानं आतापर्यंत ३ हजार २४५ लोकांना संक्रमित केलं असून ब्रुसेलोसिस हे या आजाराचं नाव आहे. चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 3 / 9आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार प्राण्यांपासून पसरतो. १ हजारापेक्षा जास्त लोकांमध्ये या आजाराचं संक्रमण झालेलं दिसून आलं आहे. 4 / 9लांझोऊ प्रांतात ब्रुसेलोसिस आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शोधून काढण्यासाठी २९ लाख लोकांपैकी २१ हजार ८४७ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. 5 / 9प्राण्यांतून ब्रुसेला हा विषाणू माणसात संक्रमित होऊन हा आजार होतो. त्यामुळे पुरुषांच्या अंडकोषांना सूज येण्याची शक्यता असते. तसेच हा आजार जडलेल्यांपैकी काही जणांची जननक्षमता नष्ट होण्याचा धोका संभवतो. 6 / 9अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आजाराला Malta fever किंवा Mediterranean fever या नावानं ओळखलं जातं. 7 / 9या आजारात डोकेदुखी, मासपेशींतील वेदना, ताप येणं, थकवा येणं ही लक्षणं दिसून येतात.8 / 9चीनने ब्रुसेलोसिसने आजारी असलेल्यांच्या तपासणीसाठी लांझोऊ प्रांतात मोठी मोहीम उघडली आहे. ज्यांना हा आजार झाला आहे, त्यांना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.9 / 9या आजारामुळे सुदैवाने एकही बळी गेलेला नाही. या आजाराचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications