New symptoms of new corona covid-19 strains in india science
चिंताजनक! देशात समोर आला कोरोनाचा नवा स्ट्रेन; व्हायरसच्या जुन्या रुपापेक्षा वेगळी आहेत ७ लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 4:36 PM1 / 10कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमुळे जगभरात चिंताजनक वातावरण पसरलं आहे. देशात अनेक लोकांना ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनचं संक्रमण झालं आहे. कोरोनाचा ब्रिटनमध्ये आढळून आलेला स्ट्रेन भारतात अधिक घातक रूप घेऊ शकतो. आधीच्या कोरोना व्हायरसपेक्षा नवीन स्ट्रेनची लक्षणं कशी वेगळी आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10२०१९ मध्ये वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरची लक्षणं ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, वास घेण्याची क्षमता कमी होणं ही होती. आता कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे लोकांना अधिक सावध राहवं लागणार आहे. कारण या स्ट्रेनची लक्षणंही वेगळी आहेत. 3 / 10ब्रिटनमध्ये पसरलेल्या या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये सात प्रकारची लक्षणं दिसून येत आहेत. आता या व्हायरसनं भारतातील सर्वाधिक लोकांना संक्रमित केलं आहे. या लक्षणांमध्ये सांधेदुखी, डायरिया, कंजक्टिवायटीस, डोकेदुखी, त्वचेतील सुखेपणा, खाज येणं, बोंट आणि टाचांचा रंग बदलणं यांचा समावेश आहे. 4 / 10ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील कोरोना व्हायरस स्ट्रेन मागच्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनच्या तुलनेत अधिक जास्त धोकादायक आहे. या व्हायरसमुळे निरोगी लोक आजारी पडू शकतात. इंग्लंडची नॅशनल हेल्थ सर्विस संस्था (NHS) नं दिलेल्या माहितीनुसार नवीन स्ट्रेननं प्रभावित असलेल्या लोकांमध्ये सामान्य लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणं आढळून आली आहेत.5 / 10NHS नं दिलेल्या माहितीनुसार आपल्या शरीराचे तापमान समान्यपेक्षा जास्त असेल तर त्वरित कोरोनाची चाचणी करून घ्यायला हवी. नवीन स्ट्रेनची लक्षणं सामान्य सर्दी तापाप्रमाणेच असतात. जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल कोरोनाची चाचणी करून घ्या6 / 10जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत लोकांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास स्वतःला आयसोलेट करून घ्या, भरपूर पाणी प्या, शरीराचं तापमान योग्य राहिल याची काळजी घ्या.7 / 10केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट N440K आणि E484Q यात कोणताही संबंध नाही. 8 / 10आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार या स्ट्रेनमुळे भारतातील कोरोना संसर्गात वाढ झालेली नाही. 9 / 10. निती आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सार्स के युके स्ट्रेनमुळे आतापर्यंत १८७ लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. 10 / 10दक्षिण आफ्रिकेच्या नव्या स्ट्रेनमुळे १८७ लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications