शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लॉकडाऊनमध्ये घरात बसून झोप येत नाहीये? चांगल्या झोपेसाठी वापरा 'या' टिप्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 3:33 PM

1 / 10
साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप घेण निरोगी राहण्यासाठी आवश्यक असतं. जर तुम्ही ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असा तर थकवा जाणवणे, डोकेदुखी, मुड चांगला नसणं, अस्वस्थ वाटणं अशा समस्या उद्भवत असतात. आज आम्ही तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी काय करायला हवं याबाबत सांगणार आहोत. कारण झोप न येण्याची अनेक कारणं असू शकतात.
2 / 10
एकामागोमाग एक विचार येणं : नकारात्मक विचार सतत डोक्यात येत असल्यामुळे मेंदू सतत एक्टिव्ह असतो. त्यामुळे झोप येत नाही. सतत येणारे विचार थांबवण्यासाठी तुम्ही गाणी ऐकणं, व्यायाम, योगा करून मन शांत ठेवू शकता. दिवसभर व्यस्त असल्यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही.
3 / 10
शरीर आपल्या उर्जेचा पूर्णपणे वापर करत नाही त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवते.ज्याप्रमाणे तुम्ही ऑफिसच्या कामाचं रुटीन ठरवत असता. याप्रमाणे लॉकडाऊमध्ये उठण्याच्या झोपण्याच्या वेळेचं रुटीन तयार करा.
4 / 10
नजर एकाचजागी असू नये: सध्या मोबाईल, टिव्ही, लॉपटॉपमुळे स्क्रिनवर नजरा तशाच राहतात. परिणामी मेंदू योग्यवेळी झोप येण्याचे सिग्नल्स देत नाही. त्यामुळे झोपेची पद्धत डिस्टर्ब होते. त्यासाठी रात्री जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर टिव्ही, मोबाईल बंद करून आराम करा.
5 / 10
जे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यापैकी सर्वाधिक लोकांना बेडवर बसून काम करायला आवडतं. त्यामुळे काम करत असताना कधीही झोप आली की काहीवेळ बेडवर झोपतात. परिणामी अवेळी झोपल्यामुळे रात्री झोप येत नाही. काम करताना शक्यतो बेडवर बसू नका. कारण त्यामुळे काम करण्याचा वेग मंदावण्याची शक्यता असते. त्यामुळे मान, पाठ दुखण्याचा त्रास होतो. आळससुद्धा येतो.
6 / 10
सतत घरी बसून राहिल्यामुळे सुर्यप्रकाशाची संबंध येत नाही. परिणामी शरीरातील मॅलिटोनिन हार्मोन तयार होण्यास बाधा येते. त्यामुळे स्लिप सायकल मेंनेट राहत नाही.
7 / 10
ज्या लोकांना व्यसन करण्याची सवय आहे. अशा लोकांचं लॉकडाऊनमुळे खूप बदल झालेला दिसून येत आहे .
8 / 10
उदा. ज्या व्यक्तीला दिवसभरातून ५ वेळा स्मोकिंग करण्याची सवय होती. त्यांनी रिकामावेळ असल्यामुळे स्मोकिंग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. अशा व्यसनांमुळे शरीरातील निकोटीनचं प्रमाण वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवते.
9 / 10
झोप येत नसेल तर कोणतंही पुस्तक वाचत झोपा जेणेकरून तुम्हाला १५ ते २० मिनिटात शांत झोप लागेल.
10 / 10
चांगली झोप येण्यासाठी रात्री झोपायच्या एक तास आधी कोमट पाण्याने अंघोळ करा. रात्री झोपताना शक्यतो सुती कपडे वापरा. झोप येत नसेल तर मोबाईलचा वापर करू नका.
टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या