NSW health authorities released bizzare intimate guidelines for Australian's during covid-19
हसावं की रडावं! कोरोनाच्या भीतीने ऑस्ट्रेलिया सरकारने शारीरिक संबंधाबाबत काढल्या अजब गाइडलाईन... By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 4:25 PM1 / 9कोरोना व्हायरसच्या महामारी काळात हेल्थ एक्सपर्ट कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य ते उपाय सुचवत आहेत. जगातल्या इतर देशांप्रमाणे ऑस्ट्रेलियातही याबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी दीड मीटरचं अंतर, हॅंडवॉश आणि पार्टनरला कंबरेकडून मिठी मारण्यासारख्या गोष्टींवर जोर दिला जात आहे. अशातच ऑस्ट्रेलिया हेल्थ अथॉरिटी बेडरूममधील कपलसाठी जारी केलेल्या एका अजब कोविड सेफ्टी 2 / 9न्यू साउथ वेल्सच्या हेल्थ वेबसाइटवर 'प्लेसेफ' चे नियम वाचून प्रत्येकजण कपाळावर हात मारून घेत आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांना शारीरिक संबंधादरम्यान दीड मीटरचं अंतर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. बेडरूममध्ये पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवताना फिजिकल डिस्टंसिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.3 / 9हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सुरक्षित राहण्यासाठी लोकांना सोलो सेक्स करण्याची सल्ला देण्यात आला आहे. नव्या गाइडलाईन्सनुसार, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत इंटीमेट होत असाल आणि ती व्यक्ती आधीच तुमच्यासोबत राहत असेल तर घाबरण्याची गरज नाही. पण जे लोक कॅज्युअल सेक्स करत आहेत त्यांच्यासाठी हेल्थ एक्सपर्टने काही सूचना दिल्या आहेत.4 / 9वेबसाइटनुसार, एखाद्या बाहेरील व्यक्तीसोबत शारीरिक संबंध अजूनही धोकादायक आहे आणि दीड मीटरचं फिजिकल डिस्टंस ठेवून शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच कोरोना काळात सोलो सेक्सलाही सर्वात सुरक्षित पद्धत मानलं आहे.5 / 9हेल्थ एक्सपर्टच्या या सूचनांमध्ये विरोधाभास आहे. NSW हेल्थ अथॉरिटीज तुम्हाला पार्टनरसमोत ठराविक अंतर ठेवून शारीरिक संबंध ठेवण्याची सूचना देतं. 6 / 9एक्सपर्टनुसार, असं केल्याने केवळ कोविड-१९ चा धोकाही टळतो आणि सेक्शुअल ट्रान्समिशन डिजीज किंवा इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. सोबतच याने बर्थ कंट्रोल या रूपातही पाहिलं जात आहे. 7 / 9दरम्यान आतापर्यंत स्पर्म किंवा वजायनल फ्लूडच्या माध्यमातून कोविड-१९ चं इन्फेक्शन पसरण्याचा उदाहरण सापडलं नाही. पण हा व्हायरस रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आणि लाळेच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे पार्टनरला किस न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शक्य असेल तर तीन लेअर असलेल्या मास्कने तोडं-नाक कवर करण्याचाही सल्ला दिला आहे. 8 / 9त्यासोबतच लोकांना कंडोम आणि डेंटल डॅमसारख्या गोष्टी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच फोन किंवा व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून मेसेजिंग किंवा इन्टिमेट होण्याचाही सल्ला दिला आहे.9 / 9पार्टनर बेडरूम किंवा एका शहरात नसल्यास तुम्ही त्यांच्यासोबत फोन किंवा व्हिडीओ चॅट्च्या माध्यमातून टाइम स्पेंड करू शकता, असेही सांगण्यात आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications