शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron News: धोका वाढला! देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा; तज्ज्ञांच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 3:41 PM

1 / 9
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सगळ्यांचीच चिंता वाढवली. ५० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला आहे. गेल्या आठवड्यात देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला.
2 / 9
२ डिसेंबरला कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर दोनच दिवसांत महाराष्ट्रात ओमायक्रॉननं शिरकाव केला. सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आहेत. यातले १० रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशात आढळून आलेल्या बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा दिसून आला आहे.
3 / 9
राजस्थानात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ९ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व रुग्ण एसिम्टेमॅटिक आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. देशात आढळून आलेल्या बहुतांश ओमायक्रॉन बाधितांमध्ये हा समान धागा आहे.
4 / 9
आम्हाला कोविड-१९ च्या ११ केसेस मिळाल्या आहेत. यातील बहुतांश जण ओमायक्रॉन बाधित कुटुंबाच्या संपर्कात आले आहेत किंवा जर्मनीहून परतले आहेत, अशी माहिती जयपूरचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरोत्तम शर्मांनी दिली.
5 / 9
११ जणांचे नमुने गोळा करून जिनॉम सिक्वन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून न आल्याची माहिती शर्मांनी बिझनेस लाईनला दिली.
6 / 9
एलएनजेपी रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेल्या एका रुग्णाला सर्दी आणि घशात खवखव असा त्रास होता. मात्र आणखी कोणतीही लक्षणं नव्हती. ओमायक्रॉनच्या बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत.
7 / 9
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आला. परदेशातून आलेला मॅकेनिकल इंजीनियर ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्यावर उपचार झाले. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ७ दिवस घरातच क्वारंटिन राहण्याचा सल्ला त्याला देण्यात आला आहे.
8 / 9
ओमायक्रॉनच्या सौम्य लक्षणांमुळे वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. लक्षणं सौम्य असल्यामुळे लोक चाचणी करायला येत नाहीत. ते विलगीकरणातही राहत नाहीत. त्यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार वेगानं होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांना वाटते.
9 / 9
लक्षणं सौम्य स्वरुपाची असल्यानं अनेकांना कोरोना झाल्याचं समजतही नाही. त्यामुळे ते काळजी घेत नाहीत. त्यातच सौम्य लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरतो. त्यामुळे तज्ज्ञ चिंतेत आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन