omicron variant common symptoms in kids rising cases in young
Omicron News: तरुणांना, लहानग्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखावं? जाणून घ्या ६ महत्त्वाची लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 5:29 PM1 / 9कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटनं शिरकाव केला आहे. भारतात गेल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. 2 / 9देशात सध्याच्या घडीला ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक १० रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. लहान मुलांना ओमायक्रॉनचा मोठा धोका आहे. त्यामुळे पालकांना काळजी वाटू लागली आहे.3 / 9दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या दोन्ही देशांत लहान मुलांना ओमायक्रॉननं लक्ष्य केलं आहे. डेल्टा आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे.4 / 9ओमायक्रॉनची लक्षणं व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात असं डॉक्टर सांगतात. पण तरुणांमध्ये काही लक्षणं समान आहेत. जास्त थकवा, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणं बहुतांश तरुणांमध्ये आढळून आली आहेत. 5 / 9डेल्टा आणि इतर व्हेरिएंटची लागण झाली तेव्हा अनेकांच्या तोंडाची चव गेली होती. त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. ओमायक्रॉन बाधित तरुणांमध्ये ही समस्या जाणवत नाही. पण काहींना घशात खवखव जाणवत आहे.6 / 9दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन बाधित लहान मुलांची संख्या वाढली आहे. त्यांच्यामध्ये सौम्य आणि गंभीर स्वरुपाची लक्षणं आहेत अशी माहिती ख्रिस हानी बरगवनाथ ऍकेडमिक रुग्णालयाचे डॉ. रुडो मथिवा यांनी दिली. लहान मुलांना ऑक्सिजन सपोर्टिव्ह थेरेपीची गरज भासत आहे. ते आधीच्या तुलनेत अधिक आजार पडत असल्यानं त्यांना जास्त दिवस रुग्णालयात ठेवावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.7 / 9अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये विशेष लक्षणं दिसून येत आहेत. तीव्र ताप, सतत खोकला (एक तासापर्यंत), थकवा, डोकेदुखी, घशात खवखव आणि भूक न लागण्याची समस्या अशा त्रासाचा सामना लहानग्यांना करावा लागत आहे.8 / 9पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू लागली आहे. लहान मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असल्यानं त्यांना व्हेरिएंटची लागण लवकर होत असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.9 / 9देशात आतापर्यंत २३ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील १० जण महाराष्ट्रातील आहेत. पुण्याच्या एका कुटुंबातील ६ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. राजस्थानातील ९ जणांना लागण झाली आहे. कर्नाटकात २, तर दिल्ली, गुजरातमध्ये प्रत्येकी एकाला ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications