शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : अलर्ट! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 3:43 PM

1 / 12
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 12
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,47,417 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा 5,488 वर पोहोचला आहे.
3 / 12
कोरोनाचा मोठ्याप्रमाणेच चिमुकल्यांवर देखील वाईट परिणाम होत आहे. तिसरी लाट मुलांसाठीही घातक असल्याचं म्हटलं जात आहे. डॉक्टरांनी देखील खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पालकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
4 / 12
मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ताप येत असेल तर काळजी घ्या. ओमायक्रॉनच्या संकटात मुलांच्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यायचं याबाबत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
5 / 12
यशोदा हॉस्पिटल, गाझियाबादचे एमडी डॉ. पीएन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची तिसरी लाट इतर दोन लाटांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळेच हे लहान मुलांसाठीही धोकादायक आहे.
6 / 12
कोरोनाची तिसरी लाट मुलांनाही संक्रमित करू शकते. त्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या मुलांमध्ये खूप ताप आणि थरथरणे यासारखी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
7 / 12
कोरोनाबाधित मुलांचे वय 11 ते 17 वर्षे दरम्यान आहे. दोन वर्षांखालील मुलांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत. डॉ. अरोरा यांनी ओमायक्रॉन हा डेल्टा प्रकारापेक्षा थोडा वेगळा आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं सांगितलं.
8 / 12
लहान मुलांमध्ये या आजाराची सामान्य लक्षणं असल्यास ती अजिबात दुर्लक्षित करू नये. डॉ. अरोरा यांनी सामान्य लक्षणे दिसल्यावर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार करा असं म्हटलं आहे.
9 / 12
इतर रुग्णांप्रमाणे, जास्त ताप आल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मुलांना रुग्णालयात दाखल करा. कोरोनाबाबत अधिक घाबरून न जाता दक्ष राहण्याची गरज आहे.
10 / 12
मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. दोन वर्षांच्या मुलांना जास्त धोका आहे. त्यांच्यातील संसर्गाची तीव्रता डेल्टा प्रकारासारखीच असते. ओमायक्रॉन प्रामुख्याने रुग्णाच्या वरच्या श्वसनमार्गावर परिणाम होतो.
11 / 12
सर्दी, डोकेदुखी, नाक वाहणे अशी लक्षणे त्यात दिसून येतात. याशिवाय थरथरण्याबरोबर तापही येतो. दहापैकी फक्त दोन किंवा तीन रुग्ण वास आणि चव कमी झाल्याची तक्रार करतात असं ही ते म्हणाले.
12 / 12
ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात देखील रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रात आढळून येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनdoctorडॉक्टर