Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनची लागण झाली तरी आता नो टेन्शन, कारण...; रिसर्चमध्ये खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 10:03 IST
1 / 15जगभरात कोरोना थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने 35 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रगत देशही कोरोनाच्या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत. 2 / 15जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता ओमायक्रॉन य़ा नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. अशातच रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 3 / 15कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभावी रोग प्रतिकारशक्ती विकसित होते, जी फक्त ओमायक्रॉनच नाही तर डेल्टासह इतर प्रकारांनाही निष्प्रभ करू शकते. 4 / 15आयसीएमआरने (ICMR) केलेल्या रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन-निर्मित प्रतिकारशक्ती व्हायरसच्या डेल्टा थोपवू शकते. यामुळे डेल्टा पासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. 5 / 15डेल्टाचा संसर्ग संपुष्टात येईल, असेही मत रिसर्चमध्ये मांडण्यात आले आहे. या संशोधनात ओमायक्रॉनवर लस बनविण्यावर भर देण्यात आला आहे. AstraZeneca, Moderna, Pfizer यासह इतर अनेक कंपन्या नवी लस बनवण्याच्या तयारीत आहेत. 6 / 15मार्चच्या अखेरीस ही लस ओमायक्रॉनला टक्कर देण्यासाठी बाजारात येईल असा दावा केला जात आहे. PTI च्या वृत्तानुसार, ICMR ने एकूण 39 लोकांचा अभ्यास केला, त्यापैकी 25 जणांनी AstraZeneca च्या अँटी-कोरोना व्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतले.7 / 15आठ जणांनी Pfizer लसीचे दोन्ही डोस घेतले, तर सहा जणांनी कोरोनाची कोणतीही लस घेतली नव्हती. याशिवाय 39 पैकी 28 लोक यूएई, आफ्रिकन देश, मध्य आशिया, अमेरिका आणि ब्रिटनमधून परतले होते, तर 11 लोक उच्च जोखमीच्या संपर्कात होते. 8 / 15या सर्व लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली होती. या रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्यासाठी आयजीजी अँटीबॉडी आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी (एनएबी) चा रिसर्च करण्यात आला आहे. 9 / 15रिपोर्टनुसार, आम्हाला असे आढळून आले आहे की ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे, हे अँटीबॉडी ओमायक्रॉन आणि डेल्टासह इतर प्रकारच्या कोरोनाला निष्प्रभावी करू शकते.10 / 15कोरोना लसीकरण न केलेल्या गटातील सहभागींची संख्या आणि संसर्गानंतरच्या अल्प कालावधीमुळे होते. लसीकरण न केलेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉन विरूद्ध प्रतिकारशक्ती कमी होण्याचे हे एक कारण असू शकते. 11 / 15इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या या रिसर्चमध्ये प्रज्ञा डी यादव, गजानन एन सपकाळ, रिमा आर सहाय आणि प्रिया अब्राहम यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होत आहेत.13 / 15ओमायक्रॉन हा एक असा व्हेरिएंट आहे जो अँटीबॉडीजला चकमा देतो. मग त्या अँटीबॉडीज लसीकरणामुळे तयार झालेल्या असोत किंवा जुन्या कोरोना संसर्गामुळे तयार झालेल्या असोत याची लागण पुन्हा होऊ शकते.14 / 15कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे होती ज्यात एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता. त्यामुळे आताही असा प्रश्न विचारला जात आहे, की ओमायक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो.15 / 15रिसर्चनुसार, ओमायक्रॉनमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होते.