शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री केस मोकळे सोडून झोपावं की बांधून?; जाणून घ्या, योग्य पद्धत आणि फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 4:47 PM

1 / 8
झोपताना केस नेमके कसे ठेवायचे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर बहुतेकांना माहीत नाही. त्यामुळेच झोपेत केस तुटण्याची आणि नंतर गळण्याची काळजी वाटते. रात्री केस मोकळे सोडून झोपावं की बांधून झोपावं हे जाणून घेऊया...
2 / 8
सामान्यतः लोकांना त्यांचे केस मोकळे सोडून झोपणं अधिक नॉर्मल आणि आरामदायक वाटतं. परंतु असं प्रत्येकाला वाटतंच असं नाही. त्यामुळे तुमच्यासाठी कोणती पद्धत जास्त फायदेशीर आहे हे आधी नीट समजून घ्या..
3 / 8
केस मोकळे सोडून झोपण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केसांवर कोणत्याही प्रकारचा दाब पडत नाही. यामुळे केस तुटण्याचा किंवा गळण्याचा धोका देखील कमी होतो.
4 / 8
केस लांब असतील तर ते रात्रभर झोपेत हालचाल केल्यामुळे एकमेकांमध्ये गुंतू शकतात. सकाळी विंचरताना त्यामुळे त्रास होऊ शकतो, खूप वेळ लागू शकतो. तसेच केस तुटण्याची देखील शक्यता असते.
5 / 8
झोपायच्या आधी केस बांधून ठेवल्याने केसाचा गुंता होत नाही. सकाळी केस विंचरणं सोपं होतं आणि ते कमी तुटतात. कोरड्या केसांसाठी देखील हे फायदेशीर आहे कारण ते रात्रभर उशीवर घासले जात नाहीत.
6 / 8
केस खूप घट्ट बांधल्याने स्काल्पवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे केस कमकुवत होऊ शकतात. तसेच खराब क्वालिटीचा रबर बँड वापरल्याने केस तुटू शकतात.
7 / 8
तुमच्या केसांच्या प्रकारावर आणि सवयींवर हे अवलंबून असतं. जर तुमचे केस लांब आणि दाट असतील तर झोपण्यापूर्वी ते सैल वेणी बांधणं फायदेशीर ठरू शकतं. त्याच वेळी, जर तुमचे केस लहान किंवा पातळ असतील तर ते मोकळे सोडणं अधिक आरामदायक असेल.
8 / 8
केस ओले असताना कधीही झोपू नका. झोपण्यासाठी चांगली उशी वापरा, त्यामुळे केस तुटण्यापासून वाचवतात. यासोबतच तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांना थोडेसं हेअर सीरमही लावू शकता.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स