शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भय इथले संपत नाही! भारतातील 5.72 कोटी लोकांना कोरोना नाही तर 'या' गंभीर आजाराचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 12:00 PM

1 / 10
देश कोरोनाचा सामना करत असतानाच अनेक आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे. धडकी भरवणारी माहिती आता समोर आली आहे. प्रत्येक 100 पैकी किमान चार भारतीय आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या गंभीर फंगल आजाराने ग्रासले आहे. एका अभ्यासातून ही भयावह माहिती समोर आली आहे.
2 / 10
400 हून अधिक संशोधन लेखांचा आढावा घेतल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. भारतातील साडेपाच कोटींहून अधिक लोक सीरियस फंगल आजारांनी त्रस्त असल्याचे या अभ्यासातून सांगण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतातील 4.4 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सीरियस फंगल आजाराने ग्रस्त आहे.
3 / 10
तज्ञांच्या मते, भारतात फंगल रोग सामान्य आहे, परंतु ते कोणत्या स्तरावर आहे आणि किती पसरला आहे हे स्पष्ट नाही. देशात प्रथमच अशा प्रकारचा अभ्यास करण्यात आला असून, यावरून भारतात फंगल रोगांची किती मोठी समस्या आहे हे दिसून येते.
4 / 10
दिल्ली एम्स, कल्याणी, पश्चिम बंगाल येथील एम्स आणि चंदीगडमध्ये स्थित पीजीआयएमईआर व्यतिरिक्त, यूकेच्या मँचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या अभ्यासात असे समोर आले आहे की 5.72 कोटींहून अधिक भारतीय सीरियस फंगल रोगांनी ग्रस्त आहेत, जे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 4.4 टक्के आहे.
5 / 10
AIIMS दिल्लीशी संबंधित संशोधक अनिमेश रे यांनी सांगितले की, भारतात फंगल डिजीस ही एक मोठी समस्या आहे, परंतु त्याचा कधीच विचार केला गेला नाही. ते म्हणाले की दरवर्षी सुमारे 30 लाख भारतीय टीबीने बाधित होतात, परंतु फंगल रोगाने बाधित भारतीयांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
6 / 10
रिसर्चनुसार, योनी किंवा वजायनलमध्ये होणाऱ्या अल्सरमुळे सुमारे 2.4 कोटी महिला प्रभावित आहेत. याला यीस्ट इन्फेक्शन म्हणतात. टिनिया कॅपिटिस नावाच्या केसांच्या फंगलव संसर्गामुळे मोठ्या संख्येने शाळकरी मुले प्रभावित होतात. या संसर्गामध्ये टाळूवर वेदना होतात आणि केस लवकर गळतात.
7 / 10
संशोधकांना असे आढळून आले की फुफ्फुस आणि सायनसमध्ये मोल्ड इन्फेक्शन मृत्यूसाठी जबाबदार आहे. अडीच लाखांहून अधिक भारतीय याचा सामना करत आहेत. 17.38 लाखांहून अधिक लोकांना क्रॉनिक एस्परगिलोसिस नावाच्या संसर्गाची लागण झाली आहे, ज्यामुळे श्वसन प्रणालीवर परिणाम होतो.
8 / 10
सुमारे 35 लाख भारतीय सीरियस एलर्जिक लंग मोल्ड डिजीजने ग्रस्त आहेत. डोळ्यांच्या फंगल आजाराने ग्रस्त 10 लाखांहून अधिक लोक असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. याशिवाय दोन लाख लोक म्युकोरमायकोसिस या आजाराने ग्रस्त आहेत, ज्याला 'ब्लॅक मोल्ड' म्हणतात.
9 / 10
संशोधकांचे म्हणणे आहे की भारतात दरवर्षी क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत 10 पट अधिक फंगल रोगांचा परिणाम होतो. यावरून लोकसंख्या किती मोठ्या प्रमाणात या रोगाने ग्रस्त आहे याचा अंदाज लावता येतो.
10 / 10
मँचेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डेव्हिड डॅनिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आरोग्य सुविधा अलिकडच्या वर्षांत सुधारल्या आहेत, परंतु फंगल रोग अजूनही सार्वजनिक आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे, ज्यामुळे गंभीर आजार आणि मृत्यू होतो. भारतात अजूनही चाचणी आणि उपचारांसाठी मर्यादित क्षमता आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्य