शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० किलोच्या महिलेने काही महिन्यातच कमी केलं तब्बल ४५ किलो वजन, वाचा तिने काय केलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 1:20 PM

1 / 10
जगभरातील अनेक लोक त्यांचं वजन वाढल्याने चिंतेत आहेत. अनेकदा वाढलेल्या वजनामुळे अनेकांना अपमानाचाही सामना करावा लागतो. अनेकजण खिल्ली उडवतात. असाच अनुभव अमेरिकेच्या गिल्बर्टमध्ये राहणाऱ्या सारा डॉयलर येत होता. ३३ वर्षीय साराला वाटत होतं की, लठ्ठपणामुळे तिच्यासोबत कुणीही लग्न करणार नाही आणि ती नेहमीसाठी एकटीच राहणार.
2 / 10
सारा जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिची खाण्याची सवय झाली होती की, ती दिवसा उपाशी रहायची आणि रात्री जास्त जेवण करत होती. अशात ती तिच्या वयाच्या हिशेबाने अधिक जास्त खात होती. साराची ही सवय बरीच वर्षे होती आणि २५ वर्षानंतर तिचं वजन जवळपास १०० किलोंपर्यंत पोहोचलं. इतकं वजन वाढल्याने तिला स्वत:ची लाजही वाटत होती. ती फॅमिली फंक्शन किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी जरा घाबरत होती. हळूहळू तिच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागला होता आणि तिला असं वाटू लागतं होतं की, तिला लाइफपार्टनर मिळणार नाही.
3 / 10
अशात साराने वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि तिने वर्टिकल गॅस्ट्रिक स्लीव सर्जरी करण्याचं ठरवलं. या सर्जरीने तिच्या पोटाचा आकार कमी झाला. हळूहळू तिच्या खाण्याच्या पद्धतीत बदल झाला. आता ती खाण्यात केवळ २ हजार कॅलरी घेते. त्यासोबतच शरीर फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत आणि एक्सरसाइजही करते. ज्यामुळे तिचं शरीर शेपमध्ये राहतं
4 / 10
सारा आता 'टीम फिट विद मी'ची हेड कोच बनली आहे. इतकंच नाही तर तिने मार्क नावाच्या व्यक्तीसोबत लग्नही केलं आहे. दोघेही आनंदाने संसार करत आहेत.
5 / 10
सारा बालपणी प्रोफेशनल घोडेस्वार होती. तिची लाइफस्टाईल फार अॅक्टिव होती. पण अॅक्टिव लाइफनंतरही तिचं वजन वाढत गेलं. आधी तर तिच्या खाण्याच्या चुकीमुळे आणि नंतर वाढत्या लठ्ठपणाच्या डिप्रेशनमुळे तिचा आहार वाढत गेला होता.
6 / 10
साराने सांगितले की, मी न्यूजर्सीमध्ये आई-वडील आणि एका मोठ्या भावासोबत वाढले. ते सगळेच त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेत होते. पण मी एकटीच असे होते की, काही लक्ष देत नव्हते. मला लहानपणापासूनच वजन वाढण्याची समस्या सुरू झाली होती. जेव्हा मी घोडेस्वारी सोडली तेव्हा तर माझं वजन अधिक वेगाने वाढत गेलं. याने मी डिप्रेशनमध्ये आली होते. मी सर्व प्रकारच्या डाएट फॉलो केल्या. पण कोणताही फायदा झाला नाही. जास्त खाण्याची माझी सवय वाढतच जात होती.
7 / 10
सारा म्हणाली की, जेव्हा मी ३० वर्षांची झाले तेव्हा मला वाटलं की, माझ्या नशीबात लठ्ठ होणंच लिहिलं आहे. वाढत्या वजनामुळे मला असं वाटू लागलं होतं की, मी आयुष्यभर एकटीच राहणार आहे.
8 / 10
या सर्व गोष्टींनंतर साराने एका सर्जनला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी वर्टिकल स्लीव सर्जरी करण्याचा सल्ला दिला. या सर्जरीमध्ये पोटाचा आकार कमी करून दिला जातो. ज्यामुळे ८५ टक्के भूक नष्ट होते. व्यक्ती कमी खाऊ लागतो. साराने हा सल्ला मानत ऑगस्ट २०१६ मध्ये सर्जरी केली.
9 / 10
सर्जरीनंतर सारा पुढील ६ महिन्यांपर्यंत केवळ ८०० कॅलरी घेत होती. आणि आठवड्यातील ६ दिवस जिमला जात होती. ती रोज एक तास कार्डिओ करत होती. काही महिन्यातच तिचं वजन कमी होऊ लागलं. पण तिच्या खाण्या-पिण्यातील बदलांमुळे वजन पुन्हा वाढू लागलं होतं.
10 / 10
ती पुन्हा वजन वाढत असल्याने चिंतेत होती. पण तिने वजन वाढू दिलं नाही. ती नंतर रोज २ हजार कॅलरीज आहारातून घेत होत आणि रेग्युलर जिमला जात होती. तिच्या या मेहनतीचा फायदा हा झाला की, तिने तिच्या १०० किलो वजनापैकी ४५ किलो वजन कमी केलं. तिचं हे ट्रॉन्सफॉर्मेशन तिच्या क्लाएंटसाठी मोटिवेशन आहे. ज्यांना तिच्यासारखंच वजन कमी करायचं आहे.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सJara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी