शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

International Kissing Day : किस केल्यामुळे 'हे' आजार पसरू शकतात, राहा सावध...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 1:15 PM

1 / 9
आज, 6 जुलैला इंटरनॅशनल किसिंग डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स किसच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. किस हे नेहमीच प्रेमाचे प्रतीक राहिले आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? किसद्वारे सुद्धा सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन (STIs) होऊ शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी, हे जाणून घ्या....
2 / 9
हर्पीस सिम्प्लेक्स हा व्हायरसमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो त्वचेत वेगाने पसरतो. हर्पीस संसर्ग दोन प्रकारे पसरतो.
3 / 9
हर्पीसचा एक प्रकार HSV-1 आहे, ज्याला ओरल हर्पीस म्हणून देखील ओळखले जाते. ओरल हर्पीस किसद्वारे सहज पसरतो. याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तोंडात लहान पांढरे किंवा लाल फोड. कधीकधी त्यातून रक्तही बाहेर येऊ शकते. किस केल्यामुळे एकापासून दुसर्‍याकडे हा संसर्ग जाऊ शकतो. कोणतीही लक्षणे नसतानाही हा संसर्ग पसरतो. तसेच, लाळ किंवा एकाच भांड्यात खाल्ल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.
4 / 9
हर्पिसचा दुसरा प्रकार HSV-2 आहे, याला जेनिटल हर्पीस म्हणून देखील ओळखले जाते. या प्रकारचा हर्पीस प्रामुख्याने लैंगिक संपर्काद्वारे पसरला जातो. परंतु किसद्वारे देखील याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. HSV-2 ची लक्षणे ओरल हर्पीस सारखीच आहेत. या दोन्ही प्रकारचे हर्पीस पूर्णपणे बरे होत नाहीत. आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास आपल्याला त्यातील केवळ सौम्य लक्षणे समजतील. या संसर्गावर मात करण्यासाठी डॉक्टर रुग्णाला अँटीव्हायरल औषधे देतात.
5 / 9
सायटोमेगा (CMV) हे व्हायरल इन्फेक्शन आहे, जे लाळेच्या संपर्कात आल्याने होऊ शकते. यामध्ये व्हायरस आहे. याशिवाय, हा रक्त, वीर्य किंवा स्तनाद्वारे देखील पसरते. याला सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन, यासाठी मानले जाते कारण बहुतेक वेळा हे ओरल आणि जननेंद्रियाच्या संपर्काद्वारे पसरते.
6 / 9
सायटोमेगालो व्हायरसची लक्षणे - थकवा, घसा खवखवणे, ताप, शरीरावर वेदना ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर सायटोमेगा व्हायरसचा उपचार देखील पूर्णपणे शक्य नाही. हर्पीसच्या औषधांद्वारे देखील यावर उपचार केला जाऊ शकतो.
7 / 9
सिफलिस हा एक प्रकारचा बॅक्टेरियल संसर्ग आहे. जो सहसा किसद्वारे पसरत नाही. हा सहसा ओरल किंवा जेनिटल सेक्सद्वारे पसरतो. सिफलिसमुळे तोंडात फोड येतात आणि किस घेतल्यास हे बॅक्टेरिया एकाच्या तोंडातून दुसऱ्याच्या तोंडात जातात. डीप किंवा फ्रेंच किसमुळे हा संसर्ग पसरण्याचा अधिक धोका असतो. जर सिफलिसचा वेळेवर उपचार केला गेला नाही तर ते गंभीर होऊ शकते.
8 / 9
सिफलिसची लक्षणे- ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, लिम्फ नोडमध्ये सूज, केस गळणे, शरीरावर वेदना, थकवा, असामान्य डाग, मुरुम किंवा मस्से, कमकुवत डोळे, कमकुवत हृदय, मानसिक आजार, मेंदूचे नुकसान आणि त्याचे मुख्य लक्षण म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणे. काही अँटीबायोटिक औषधाद्वारे देखील त्यावर उपचार केले जाऊ शकतात.
9 / 9
सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शन हा एक विषय आहे, ज्यावर लोक उघडपणे बोलू शकत नाहीत. सेक्शुअली ट्रांसमिटेड इंफेक्शनबद्दल आपल्या मनात काही संकोच असेल तर त्याबद्दल आपल्या जोडीदाराशी बोला. आपण आपल्या जोडीदारासह सेक्स संबंधाबद्दल काही मर्यादा सेट करू इच्छित असल्यास आपल्या पार्टनरला याबद्दल सांगा. आपल्या भावनांविषयी प्रामाणिक रहा आणि त्याबद्दल आपल्या जोडीदाराशी नक्कीच बोला.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स