शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

High Blood Pressure: हाय बीपी असल्यास 'अशा पद्धतीचे' डाएट फायद्याचे, अमेरिकन तज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:18 PM

1 / 10
उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' असे म्हटले जाते. ब्लड प्रेशरची सुरुवातीची लक्षणं खुप साधारण असतात पण हळूहळू याची लक्षणं अधिक गंभीर होऊ लागतात. या आजाराचं वेळीच निदान आणि आजारावर उपाय नाही केले तर ब्रेन स्ट्रोक, किडनी डॅमेज, लिव्हर डॅमेज तसेच हृदयाशी संबधित आजार होऊ शकतात.
2 / 10
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि लंडन मधील इम्पेरियल कॉलेजमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ३० ते ७९ वयोगटातील हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांची संख्या ६५० मिलियन वरुन १.२८ बिलियन झाली आहे. यात हैराण करणारी गोष्ट अशी आहे की यातील अर्ध्या लोकांना त्यांना हा आजार आहे हेच माहित नव्हते.
3 / 10
न्युट्रिफॅक्ट्सचे निर्माते आणि अमेरिकन डॉक्टर मायकल ग्रेगर यांनी युट्युबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात या गंभीर आजाराचे सर्वात मोठे कारण काय आहे आणि यावर कशी मात केली जाऊ शकते हे सांगितले आहे.
4 / 10
ग्रेगर यांना 'हाऊ नॉट टु डाय', 'हाऊ नॉट टु डाय कुकबुक ', 'हाऊ नॉट टु डाएट', 'हाऊ नॉट टु डाएट कुकबुक' या जगातील प्रसिद्ध पुस्तकांसाठी ओळखले जातात.
5 / 10
त्यांच्या मते ब्लड प्रेशर वाढणे हा वयापरत्वे होणारा आजार नाहीये. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी प्लांट बेस्ड डाएट घेणे फायद्याचे आहे. तुम्ही कधीतरी मांसाहाराचे सेवन करु शकता पण मर्यादित आणि प्लांट बेस्ड डाएट सोबतच. त्यांनी सांगितले की, यामुळे ब्लड प्रेशर ११०/७० मिलिग्राम/डीएल इतके राखण्यास मदत होते.
6 / 10
डॉ. ग्रेगर यांनी अमेरिकन महाविद्यालयात झालेल्या अभ्यासाचा दाखला देत सांगितले की जे लोक अधिक मांसाहाराचे सेवन करतात त्यांच्यामध्ये हाय ब्लड प्रेशरची समस्या अधिक होती.
7 / 10
त्यांच्या आहारातून मांसहार पूर्ण बंद केला आणि प्लांट बेस्ड डाएट देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे ब्लड प्रेशर नॉर्मल झाले होते. विशेष म्हणजे त्यातील अनेकजण हाय बीपीवर औषधे घेत होते पण यानंतर त्यांची औषधे पूर्णत: बंद झाली.
8 / 10
प्लांट बेस्ड आहारात डेअरी प्रोडक्ट आणि अंड्यांचा समावेश आहे का? डॉ. ग्रेगर यांच्या मते हा फ्लॅक्सिटेरियन आहार आहे. दुध, डेअरी उत्पादने, सफेद मांस, मासे, अंडी याच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशरचा धोका वाढु शकतो.
9 / 10
तुम्ही पोसेस्ड फुड आणि प्रोसेस्ड मांसाचे सेवन कमी केले पाहिजे आणि प्लांट बेस्ड फुड आणि धान्याचे सेवन वाढवले पाहिजे.
10 / 10
डॉ. ग्रेगर यांच्या मते डॅश डाएटचा पर्याय हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उपयुक्त नाही. असं म्हटलं जातं की डॅश डाएट हे बल्ड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायद्याचे आहे. डॉ. ग्रेगर यांनी सांगितले अशा कोणत्याही डाएट करण्याच्या फंदात पडू नका. त्याचीच निवड करा जे तुमच्या फायद्याचे आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स