शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' एका सवयीमुळे लवकर ओढवतोय मृत्यू, वेळीच व्हा सावध नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 3:55 PM

1 / 10
खाण्या-पिण्यासोबतच मनुष्याच्या आयुष्यात झोपही फार महत्वाची असते. म्हणूनच एक्सपर्ट किंवा डॉक्टर्स आपल्याला सतत चांगली झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. आता यासंबंधीच एक चिंताजनक रिसर्च समोर आला आहे.
2 / 10
एका नव्या रिपोर्टनुसार रात्री झोप न येणाऱ्या किंवा कामी झोपणाऱ्या लोकांना डिमेंशिया नावाचा आजार होण्याचा धोका वाढतो. इतकंच नाही तर पुरेशी झोप न घेतल्याने अशाही काही समस्या होऊ शकतात ज्यामुळे मनुष्याचा मृत्यूही होऊ शकतो.
3 / 10
हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये मेडिसिन इन्स्ट्रक्टर रेबेका रॉबिन्सन यांच्यानुसार, 'या रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, प्रत्येक रात्रीची झोप आपल्या जीवनासाठी किती महत्वपूर्ण आहे. झोप केवळ आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टमसाठी फायदेशीर नाही तर याने मृत्यूचा धोकाही कमी केला जाऊ शकतो'.
4 / 10
एक्सपर्ट म्हणाले की, अमेरिकेसहीत जगभरातील लोकांमध्ये झोप, डेमेंशिया आणि काही कारणाने लवकर मृत्यू होण्यात संबंध एक चिंतेचा विषय आहे. वर्ल्ड स्लीप सोसायटीनुसार, कमी झोप येणं जगातल्या ४५ टक्के लोकसंख्येच्या आरोग्यासाठी घातक आहे.
5 / 10
सामान्यपणे बघितलं तर आपण रोज रात्री कमीत कमी ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. तेच यूएस सेटंर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशननुसार, अमेरिकेत प्रत्येक तिसरा व्यक्ती झोपेचा हा पॅटर्न फॉलो करू शकत नाही.
6 / 10
रिपोर्टनुसार अमेरिकेत साधारण ५ ते ७ कोटी लोक स्लीप डिसॉर्डर, स्लीप एपनिया, इंसोमेनिया आणि रेस्टलेस लेग सिंड्रोम सारख्या आजारांसोबत लढत आहेत.
7 / 10
CDC याला पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम म्हणते. कारण झोपेशी संबंधित या समस्येचा संबंध डायबिटीस, स्ट्रोक कार्डिओवस्क्यूलर डिजीज आणि डेमेंशियासोबतही आहे.
8 / 10
जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये प्रकाशित या रिसर्चचं विश्लेषण नॅशनल हेल्थ अॅन्ड एजिंग ट्रेंड स्टडीने केलं. या रिसर्चच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी २०११ ते २०१८ दरम्यानचा डेटाही तपासण्यात आला. यातून समोर आलं की, झोप न येण्याची समस्या असलेल्या लोकांना जास्तीत जास्त रात्री इतकंच काय तर प्रत्येक रात्री हीच समस्या होते.
9 / 10
रिसर्चमध्ये झोपेशी संबंधित समस्या नोंदवणाऱ्या सहभागी लोकांचे रिपोर्ट मेडिकल रेकॉर्डशी जोडून पाहिले गेले. रिसर्चमधून आढळून आलं की, झोपेशी संबंधित समस्येचा जवळपास प्रत्येक रात्री सामना करत असलेल्या ४४ टक्के लोकांमध्ये अनेक कारणांनी मृत्यूचा धोका वाढतो. तर रात्री नेहमीच या समस्येशी लढत असलेल्या ५६ टक्के लोकांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका राहतो.
10 / 10
त्याचप्रमाणे रात्री सतत झोपेची समस्या असणाऱ्या ४९ टक्के लोकांमध्ये डेमेंशियाचा धोका असू शकतो. तर रात्री नेह नेहमीच समस्या झाल्यावरही मोठ्या मुश्कीलीने झोपणाऱ्यांमध्ये या आजाराचा धोका ३९ टक्के अधिक असतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन