शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! पिझ्झा, बर्गर, पेस्ट्रीमुळे तुम्ही लवकर होऊ शकता म्हातारे; वेळीच व्हा सावध अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:07 PM

1 / 12
आजच्या काळात तरुणाई पिझ्झा, बर्गर, पेस्ट्री, केक यांसारख्या पदार्थांना पसंती देत ​​आहे. हे सर्व अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स मानले जातात. प्रोसेस्ड फूड्स आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे चवदार असू शकतात परंतु ते आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
2 / 12
NIH च्या अहवालानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका ५५%, स्लीप डिसऑर्डर ४१%, टाइप २ मधुमेह ४०% आणि नैराश्याचा धोका २०% वाढतो. हे तुम्हाला तुमच्या वयाच्या आधी म्हातारं बनवतं. त्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया...
3 / 12
तज्ज्ञांच्या मते, प्रोसेस्ड फूडमध्ये अनेक प्रकारचे स्वीटनर्स, कलर्स, थीकनर्स आणि एडिक्टिव्हसचा वापर केला जातो. प्रोसेस्ड फूडमुळे पोट फुगणं, जुलाब आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. प्रोसेस्ड फूड मेंदूच्या कार्यावरही परिणाम करतात.
4 / 12
प्रोसेस्ड फूडमध्ये फॅट्स आणि साखर जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एका अहवालानुसार, जे लोक त्यांच्या आहाराच्या २२% पर्यंत प्रक्रिया केलेले पदार्थ खातात त्यांना मधुमेहाचा धोका जास्त असतो.
5 / 12
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, जे आठवड्यातून दोन ते तीन वेळा जंक फूड खातात त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वाढतो.
6 / 12
हाय शुगर, फॅट्स आणि कार्ब्स असलेले अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो.
7 / 12
रिफाइंड कार्ब्स, एडिड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात घेतल्याने हार्मोनल असंतुलन वाढते. यामुळे शरीरात आळस आणि वजन वाढण्याची समस्या वाढते. रोज प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने लाइफस्टाइल डिसऑर्डरसारख्या समस्याही उद्भवतात.
8 / 12
सायन्स डायरेक्टच्या अहवालानुसार, प्रोसेस्ड फूडमध्ये फॅट्सचे प्रमाण शरीरात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढवते. खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हायपरटेन्शनचा धोका वाढतो.
9 / 12
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, २० हजार लोकांनी दहा वर्षे दिवसभरात प्रोसेस्ड फूड खाल्ले, त्यापैकी ६२ टक्के लोकांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या.
10 / 12
तज्ञांच्या मते, प्रोसेस्ड फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स, शुगर, ऑयल, केमिकल्स आणि मीठ जास्त प्रमाणात असते. हे खाल्ल्यानंतरही खाण्याची इच्छा होते. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
11 / 12
कार्ब्स खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. यामुळे पचनास त्रास, पोट फुगणं, पोटदुखी आणि ॲसिडिटीच्या समस्या वाढतात. ड्रिंक, व्हाईट ब्रेड आणि चिप्स, वेफर्सचे सेवन केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. शरीरात बॅक्टेरियाची पातळी वाढल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या वाढू शकतात.
12 / 12
साखर असलेले, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. याशिवाय तेलकट त्वचेचा सामना करावा लागू शकतो. प्रोसेस़्ड फूड खाल्ल्याने त्वचेवर वृद्धत्व दिसू लागतं. लवकर म्हातारपण येतं.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य