शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: दिल्लीत कोरोना लसीकरणाचा अनोखा Side Effect; काय आहे लक्षणं? डॉक्टरांनी सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:49 AM

1 / 10
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटाने त्रस्त आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनानं अवघ्या काही दिवसांत जगाला त्याच्या विळख्यात अडकवलं.कोट्यवधी लोक कोरोनाबाधित झाले तर लाखो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला.
2 / 10
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या एकमेव पर्याय म्हणजे लसीकरण, जगातील संशोधकांनी कोरोनावर लस शोधून काढली असून प्रत्येक देशात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. भारतातही कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या लसी लोकांना दिल्या जात आहेत.
3 / 10
कोरोना व्हॅक्सिन(Corona Vaccine) पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत लवकरच १०० कोटी डोस देण्याचं लक्ष्य पूर्ण करणार आहे. याचवेळी दिल्लीत कोरोना व्हॅक्सिनच्या साइडइफेक्टसचं अजब प्रकरण समोर आल्यानं डॉक्टर्सही हैराण झाले आहेत.
4 / 10
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोना लसीकरणानंतर, रक्त गोठण्याची समस्या आणि प्लेटलेट्समध्ये घट होऊ शकते. राजधानीतील सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत ७ रुग्णांवर कोरोना लसीचे विपरीत परिणाम दिसून आले आहेत.
5 / 10
सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये हेमटोलॉजी विभागाच्या डॉ. ज्योती कोटवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचे ७ रुग्ण आढळले आहेत. पहिलं प्रकरण ७ जूनला समोर आलं होतं. त्यावेळी रुग्णाच्या सीरम सँपल आर्मी रुग्णालयात पाठवला होता. गोल्ड स्टँडर्ड टेस्टमध्ये त्याची पुष्टी करण्यात आली.
6 / 10
डॉक्टरांनी सुरुवातीला ५ सँपल केरळच्या हॉस्पिटलमध्ये आणि एक दिल्लीच्या खासगी रुग्णालयात पाठवलं होतं. कमी प्लेटलेट्समुळे अशाप्रकारे स्थिती होऊ शकते असं डॉक्टर सांगतात. परंतु प्लेटलेट्स कमी होण्यासोबत रक्त गोठणं हे दुर्मिळ आहे.
7 / 10
एडेनोवायरस आधारित कोरोना व्हॅक्सिन साइडइफेक्टसच्या रुपात हे समोर आलं आहे. डेनमार्क, जर्मनी आणि कॅनडा याठिकाणीही असे रुग्ण आढळून आल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. सर गंगाराम हॉस्पिटल भारतातील एकमेव हॉस्पिटल आहे जिथे व्हॅक्सिनमुळे होणाऱ्या थ्रोम्बोटिक पुष्टी करण्यासाठी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
8 / 10
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ३ ते ३० दिवसांच्या आत वारंवार डोकेदुखी, उल्टी अथवा जखम किंवा रक्त वाहण्यासारखी लक्षणं दिसली आणि प्लेटलेट काऊंट कमी असेल तर डायग्नोसिसवर संशय येतो. त्याशिवाय डी डायमर पातळी वाढते. तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचा आहे.
9 / 10
डी डायमर ब्लडमध्ये माइक्रो क्लॉट्स बनण्याचं प्रोटीन असतो. तो शरीराच्या आतील बाजूस रक्त गोठवण्याचं काम करतो. जागतिक स्तरावर कोरोना व्हॅक्सिनेशननंतर थ्रोम्बोटिकचा प्रकार १ लाखामध्ये एका रुग्णाला आढळतो जो अतिशय दुर्मिळ असतो.
10 / 10
लसीकरणानंतर कुठलीही लक्षण आढळत असतील तर रुग्णांनी तात्काळ डॉक्टरांकडे जावं योग्य उपचार घेऊन वेळीच निदान शोधणं आवश्यक आहे. एम्स आणि लोकनायक सारख्या रुग्णालयात विचारलं असता त्यांच्याकडे असे रुग्ण आढळले नसल्याचं सांगण्यात आले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या