शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raw Milk Side Effect: कच्चे दूध पिताय? वेळीच सावध व्हा! या ५ बॅक्टेरियांमुळे गंभीर आजार होतील; सीडीसीने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 6:47 PM

1 / 10
दही आणि पनीरसारखे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. पण कच्चे दूध (अनपाश्चराइज्ड दूध) पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एवढेच नाही तर कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचाही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
2 / 10
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने आपल्या अहवालात म्हटले आहे की 1993 ते 2012 पर्यंत कच्चे दूध किंवा कच्च्या दुधाचे पदार्थ जसे की आइस्क्रीम, सॉफ्ट चीज आणि दही इत्यादींमुळे अनेक प्रकारच्या समस्या दिसल्या. त्यामुळे 1909 लोक आजारी पडले तर 144 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले.
3 / 10
कच्चे दूध हे गाय, म्हैस, मेंढ्या, शेळ्या किंवा इतर कोणत्याही प्राण्यापासून मिळते. कच्च्या दुधात असलेले हानिकारक जीवाणू मारण्यासाठी पाश्चराइज्ड केले जाते. जर तुम्ही अनपाश्चराइज्ड दूध प्यायला तर तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
4 / 10
सीडीसीनुसार कच्चे दूध आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतडे आणि पोटावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुम्हाला जुलाब, पोटदुखी किंवा वेदना, डिहायड्रेशन, मळमळ, उलट्या, ताप, वजन कमी होणे इत्यादी समस्या होऊ शकतात.
5 / 10
कच्चे दूध विशेषतः गर्भवती महिला आणि मुलांसाठी हानिकारक आहे. तुम्ही नेहमी पाश्चराइज्ड दूध प्यावे, तेही गरम केल्यानंतर. पाश्चरायझेशन ही अनेक ठिकाणी वापरली जाणारी प्रक्रिया आहे जी विशिष्ट तापमानाला दूध गरम करून हानिकारक जीवाणू नष्ट करते. दुधाच्या पिशव्यांवर देखील पाश्चराईज असे लिहिलेले असते.
6 / 10
कच्च्या दुधात कॅम्पिलोबॅक्टर, क्रिप्टोस्पोरिडियम, ई. कोलाय, लिस्टेरिया आणि साल्मोनेला यांसारखे हानिकारक विषाणू आढळतात. हे सर्व विषमज्वर, क्षयरोग, घटसर्प, क्यू ताप आणि ब्रुसेलोसिस यांसारख्या रोगांसाठी कुख्यात आहेत.
7 / 10
कच्चे दूध पिणे आणि कच्च्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. सीडीसीच्या मते, यामुळे जुलाब, ओटीपोटात पेटके किंवा वेदना, निर्जलीकरण, मळमळ, उलट्या, ताप, वजन कमी होणे, डोकेदुखी आणि शरीर दुखणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
8 / 10
कच्च्या दुधात आढळणारे धोकादायक बॅक्टेरिया (लिस्टेरिया) गर्भवती महिलांसाठी अनेक धोके निर्माण करू शकतात. यामुळे गर्भपात, अकाली प्रसूती, गंभीर आजार आणि अगदी नवजात बालकांचा मृत्यू होऊ शकतो.
9 / 10
हे जिवाणू कच्चे दूध पिणाऱ्या किंवा कच्च्या दुधापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याला गंभीरपणे हानी पोहोचवू शकतात. तथापि, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते.
10 / 10
याशिवाय एचआयव्ही/एड्स, कर्करोग आणि मधुमेह, लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी कच्च्या दुधाचे सेवन टाळावे, असे सीडीसीने म्हटले आहे.
टॅग्स :milkदूध