शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त उभं राहिल्यानेही शरीराचा व्यायाम होतो का?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:08 PM

1 / 6
आजपर्यंत आपण जॉगिंग केल्याने किंवा चालल्याने शरीराला अनेक फायदे होतात आणि वजन नियंत्रणात राहत असल्याचं ऐकलं आहे. पण तुम्ही असं कधी ऐकलं आहे का? जागेवर उभं राहिल्यानेही वजन कमी होतं. ऐकून धक्का बसला ना? पण खरचं तुम्ही तुमच्या कामामधून थोड्या वेळासाठी फक्त जागेवर उठून उभे राहिलात तरीही तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जागेवर उठून उभं राहणं देखील उत्तम एक्सरसाइज आहे. त्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
2 / 6
जेव्हा आपण बसतो त्यावेळी आपलं मेटाबॉलिज्म वेगळ्या पद्धतीने काम करत. त्याऐवजी उभं राहिल्याने त्याचं काम करण्याची पद्धत बदलते. संशोधनानुसार, उभं राहिल्याने शरीरातील फॅट्स बर्न होतात. याउलट बसल्यामुळे फॅट्स शरीरामध्ये जमा होत राहतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सतत बसल्यामुळे किंवा उभं राहिल्यामुळे स्नायू रक्त वाहिन्यांतील वजन कमी करणारे एंजाइम्स तयार करणं बंद करतात.
3 / 6
यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, उभं राहिल्याने कोलेस्ट्रॉलची लेव्हल सुधारते, डायबिटीज आणि वजनही नियंत्रणात राहते.
4 / 6
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, फक्त उभं राहिल्याने कॅलरी कशा बर्न होऊ शकतात? गोंधळून जाऊ नका. त्यामागेही कारण आहे की, जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा तुमचे पाय आणि पोटाच्या मसल्सची एक्सरसाइज होते. ज्यामुळे फॅट्स बर्न होण्यासाठी मदत होते.
5 / 6
जर तुम्हाला असं वाटत असेल की, उभं राहिल्याने तुम्हाला चालण्याएवढा फायदा होतो, तर हा तुमचा गैरसमज आहे. एक अव्हरेज युवक एक तास उभं राहिल्याने 190 कॅलरी बर्न करू शकतो. बसल्याने 130 कॅलरी बर्न होतात. तसेच जर तुम्ही एवढाच वेळ चाललत तर तुमच्या शरीरातील 320 कॅलरी बर्न होण्यास मदत होते. जर तुमच्यासाठी एक तास वॉक करणं शक्य नसेल तर तुम्ही उभं राहून याची कमतरता पूर्ण करू शकता.
6 / 6
ऑफिसमध्ये सतत काम करण्याऐवजी मध्ये मध्ये उठण्यासाठी वेळ मिळत नसेल तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ऑफिसमध्ये काम करताना खुर्चीवरून तुम्हाला अर्ध्या तासाने 10 मिनिटांसाठी उठणं गरजेचं असतं. म्हणजेच, 8 तासांच्या शिफ्टमध्ये दररोज एकूण 16 वेळा उठणं गरजेचं असतं.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य