reasons why mosquitoes bite that type of people more than others
...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात! By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 5:30 PM1 / 6अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या ठिकाणी बसल्यावर फक्त आपल्यालाच डास चावतात. आपल्यासोबतच्या इतर व्यक्तींवर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. मग असं का होतं? यामागे काही कारणं आहेत.2 / 6तुम्हाला जास्त घाम येतो का? घामाच्या वासाकडे डास जास्त आकर्षित होतात. त्यामुळे ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक डास चावतात.3 / 6लोवा स्टेट यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ एंटोमोलॉजीने केलेल्या एका रिसर्चनुसार, डास बॉडी टेंम्परेचर जास्त असणाऱ्या माणसांना जास्त चावतात. 4 / 6तुम्ही परफ्युम जास्त वापरत असाल तर तुम्हाला डास जास्त चावतील. कोणत्याही प्रकारचा गंध डासांना आपल्याकडे आकर्षित करतो. 5 / 6यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियानुसार, जास्तीत जास्त लोशन आणि क्रिम्समध्ये लॅक्टिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे डास जास्त आकर्षित होतात.6 / 6यूनिवर्सिटी ऑफ नेब्रास्का, लिंकन, यूएसएच्या संशोधनानुसार, डार्क रंग म्हणजेच ब्लॅक, लाल रंगाचे कपडे घातलेल्यांकडेही डास जास्त आकर्षित होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications