red vegetables or green vegetables which are the best for health
कोणत्या रंगाच्या भाज्या आहेत अधिक आरोग्यदायी, हिरव्या की लाल? By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 3:03 PM1 / 6टोमॅटोचा वापर भाजीपासून ते कोशिंबीर, चटणी आणि सूपदेखील बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटोमध्ये कॅल्शिअम, सायट्रिक अॅसिड, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. टोमॅटोमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. टोमॅटोचे सेवनानं रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहण्यास मदत होते.2 / 6बीट खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. केवळ बीटच नाही तर त्याच्या पानांचंही सेवन करणं आरोग्यदायी आहे. यामध्ये अँटी ऑक्सिडेंन्ट, पोटॅशिअम, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 3 / 6गाजराचे सेवन केल्यास शरीराची ताकद वाढवते. मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गाजर खाणे फायदेशीर आहे. नियमित गाजराचे किंवा त्याच्या रसाचे सेवन केल्यास चेहऱ्यावर तेज येते. गाजर खाण्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमेदेखील कमी होतात. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि ईचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.4 / 6पालकमध्ये व्हिटॅमिन, खनिजे, लोह यांसारखे पोषक तत्त्वं असतात. पालकचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. रक्ताची समस्या असणाऱ्या पालकचे सेवन करावे. 5 / 6मटारमध्ये शरीरास आरोग्यदायी अशी पोषकतत्त्वं असतात. मटारमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही. 6 / 6कोबीचे आहारात नियमित समावेश केल्यास कित्येक आजारांपासून आपला बचाव होतो. कोबीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आयोडीन आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. कोबीमध्ये कॅल्शिअम असल्यानं शरीराची हाडे मजबूत होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications