Regulator NPPA fixes rates of 100 drugs; diabetes, cholesterol, fever, infection drugs on the list
Medicine Price down : सर्वसामान्यांना मोठा दिलासा, 'ही' १०० औषधे स्वस्त होणार! By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:05 PM1 / 7नवी दिल्ली : या महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्रातील मोदी सरकारने मधुमेह, अंगदुखी, ताप, हृदय, सांधेदुखीवरील तेल आणि संसर्गावरील औषधे स्वस्त केली होती. या संदर्भात आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आणखी दिलासा देण्यासाठी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. 2 / 7ज्यामध्ये औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी ६९ फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. NPPA ने अधिसूचना जारी करत सांगतिले की, मधुमेह, वेदनाशामक, ताप आणि हृदय आणि सांधेदुखीसाठी औषधे आता स्वस्त होतील. यासोबतच ४ स्पेशल फीचर उत्पादनांना देखील मान्यता देण्यात आली आहे.3 / 7NPPA ने ६९ नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि ३१ ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. स्वस्त झालेल्या या औषधांच्या यादीमध्ये अँटी-टॉक्सिन, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3 आणि लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स यांचा समावेश आहे.4 / 7सरकारी अधिसूचनेनुसार, नवीन पॅकिंगवर सुधारित दर असेल. याचबरोबर, डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागेल. कंपन्या केवळ निश्चित किंमतीवर जीएसटी गोळा करू शकतात आणि तेही जर त्यांनी स्वतः पैसे भरले असतील.5 / 7दरम्यान, देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली होती, त्यामुळे सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 6 / 7अशा परिस्थितीत महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पानंतरच सरकारने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही दिलासादायक बातमी आली आहे. 7 / 7सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने मधुमेह, अंगदुखी, ताप, हृदय, सांधेदुखी कमी करणारे तेल आणि संसर्गावरील औषधे स्वस्त केली होती. त्यानंतर एजन्सीने 4 स्पेशल फीचर उत्पादनांनाही मान्यता दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications