remedies for high blood pressure or high bp
High Blood Pressure: उच्च रक्तदाबाची समस्या घेऊ नका हलक्यात, वेळीच करा 'हे' उपाय अन् व्हा टेन्शन फ्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 4:32 PM1 / 10ताणतणाव आणि अनियमित जीवनशैली हे आजच्या काळात उच्च रक्तदाबासाठी (High Blood Pressure) जबाबदार असलेलं सर्वात मोठं कारण आहे. हाइपरटेंशनला उच्च रक्तदाब असंही म्हणतात. हा एक गंभीर आजार असून तो साइलेंट किलर ठरतो.2 / 10यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), मूत्रपिंड निकामी होणं, पक्षाघात आणि अंधत्व येण्याचा धोका वाढतो. यामुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होतो.3 / 10ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार, हृदयाशी संबंधित समस्या आणि मृत्यू रोखण्यासाठी रक्तदाब वाढण्यापासून थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणं अत्यंत (Things You Should Know About High Blood Pressure) आवश्यक आहे.4 / 10रक्तदाब वाढल्यानं हृदयावर प्रेशर येतं, त्यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो. सामान्यतः एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 च्या वर असतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंन्शन म्हणतात. जर रक्तदाब 180/120 पेक्षा जास्त असेल तर ही स्थिती गंभीर मानली जाते.5 / 10उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात- उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी पोषक आहार घ्यावा. फळे आणि भाज्या नियमितपणे खाव्यात. जेवणात मीठ जास्त वापरू नये. दिवसभराच्या आहारात फक्त ५ ते ६ ग्रॅम मीठ नियमित खाणे पुरेसे आहे.6 / 10रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की बटाटे, संत्री, मनुका, द्राक्षे आहारात घ्या, त्यामुळे सोडियमचा प्रभाव कमी होतो आणि रक्तदाब कमी होऊ लागतो.7 / 10रक्तदाब बहुतेकदा अशा लोकांना होतो ज्यांचे वजन जास्त असते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करा. किमान १५ मिनिटे ब्रिक्स वॉक नियमितपणे करा.8 / 10रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पालक, केळी, दही आणि बदाम यासारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.9 / 10उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी जंक फूड, अल्कोहोल आणि तंबाखू खाणं टाळा.10 / 10नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका असेल, तर त्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासला पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications