शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reuse Of Cooked Oil: एकदा तळलेले तेल कितीदा वापरावे? किती हानीकारक? FSSAI सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:52 AM

1 / 12
पकोडे, बटाटे वडे असो की पुरी, भजी... तळल्यानंतर ते तेल कोणी फेकून देत नाही. तर त्याचा दोन दिवसांनी, तीन दिवसांनी वापर करतात. हे झाले घरचे. बाहेर हॉटेलात तर आजचे तेल उद्या, परवा आणि असे कित्येक दिवस टॉपअप करत वापरले जाते.
2 / 12
तेच तळलेले तेलकट, तुपकट पदार्थ आपण चवीने खातो. मात्र, असे करणे योग्य आहे का? एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले तर आरोग्यावर काही परिणाम होतो का? एवढी वर्षे वापरतो, काय होतेय असे म्हटले जाते. (Know why reusing oil is dangerous for your health)
3 / 12
एफएसएसएआय (FSSAI) ने यावर माहिती दिली आहे. एका अभ्यासानुसार खाद्य तेल एकदा वापरले की ते पुन्हा गरम केल्याने त्यातून विषारी पदार्थ तयार होतात. यामुळे शरीरात फ्री रेडिकल्स वाढतात. याद्वारे शरीरात सूज आणि अन्य प्रकारचे आजार मूळ धरू लागतात. (How Many Times Can we Re-Use Fry Oil?)
4 / 12
FSSAI च्या गाईडलाईननुसार खाद्यतेलाचा वापर पुन्हा पुन्हा केला जाऊ नये. ट्रान्स फॅटपासून वाचण्यासाठी याचा वापर तीन वेळाच केला जावा.
5 / 12
परंतू जेवढे शक्य असेल तेवढे तेल पुन्हा गरम करणे आणि त्याचा वापर करणे टाळले पाहिजे. खाद्यतेलाच्या पुनर्वापराने काय नुकसान होते, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
6 / 12
कोणत्या प्रकारचे खाद्य पदार्थ तळले जात आहेत त्यावर एखादी व्यक्ती कितीवेळा त्या तेलाचा पुन्हा वापर करते हे अवलंबून असते. तसेच कोणत्या प्रकारचे तेल आहे आणि ते किती तापमानावर गरम केले गेले होते. यावरही तेलाचा पुनर्वापर अवलंबून आहे.
7 / 12
उच्च तापमानावर गरम केलेल्या तेलातून विषारी धूर निघतो. घरातही असे बऱ्याचदा दिसते. यामुळे हा धूर निघण्याच्या बिंदूआधीपर्यंतच ते गरम केले जावे.
8 / 12
जेव्हा तेल पुन्हा पुन्हा गरम केले जाते, तेव्हा त्यातील फॅट पार्टिकल तुटतात. यामुळे तेल त्याच्या धूर निघण्याच्या बिंदूपर्यंत पोहोचते. तसेच पुन्हा पुन्हा वापरल्यावर तेलाला एक वास येऊ लागतो. जेव्हा असे होते, तेव्हा आजार पसरविणारे पदार्थ हवेत आणि जेवनात मिसळतात.
9 / 12
उच्च तापमानावर तेलात असलेले काही फॅट ट्रान्स फॅटमध्ये बदलतात. हे फॅट धोकादायक असतात. यामुळे हृदयरोगासारखा धोका वाढतो. जेव्हा तेलाचा पुन्हा वापर केला जातो, तेव्हा हे ट्रान्स फॅट देखील वाढलेले असतात. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.
10 / 12
जेवनातील आर्द्रता, हवेतील ऑक्सिजन, उच्च तापमान, हाइड्रोलिसिस, ऑक्सीकरण आणि पोलीमराइजेशन सारख्या प्रक्रिया होतात. या प्रक्रिया वापरातील तेल, फॅटी अॅसिड, मोनोग्लिसराइड्स, डाइग्लिसराइड्स आणि ट्राइग्लिसराइड्स उत्पन्न करणारे रेडिकल उत्पन्न करतात. यामुळे तेलाची रासायनिक रचना बदलते व विषारी होते.
11 / 12
टोटल पोलर कंपाऊंड्सनुसार यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. कुकुंग ऑईलच्या डिसग्रेडेशनला मोजण्यासाठी एक विश्वासार्ह बेंचमार्क आहे. सारखे सारखे तळल्याने या पदार्थांमधील टॉक्सिसिटी शरीरात लिपिड जमण्याची क्षमता वाढवितात .यामुळे ऑक्सिडेटिव्ह तनाव, ब्लड प्रेशर आणि एथेरोस्क्लेरोसिस आदींचे कारण बनते.
12 / 12
यामुळे वारंवार वापरलेले तेल विषारी असते हे गृहिणींसह सर्वांना माहिती असते. तरीही बचतीसाठी, वाया जाईल म्हणून त्याचा वापर केला जातो. मात्र, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजेनुसारच तेलाचा वापर करणे हिताचे आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स