Risk of heart disease due to high cholesterol; Make the necessary changes in your daily diet!
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 3:09 PM1 / 6रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल (Cholesterol) वाढल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी रोजच्या आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.2 / 6आवळामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अमिनो अॅसिड हे गुणधर्म असतात. जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.3 / 6ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल असते. पॉलीफेनॉल शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते.4 / 6लिंबूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी आहे जे उच्च रक्तदाब कमी करते आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी करते.5 / 6पालक या भाजीमध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे मिनरल्स आढळतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतात.6 / 6डिस्क्लेमर : सदर माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सविस्तर माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आणखी वाचा Subscribe to Notifications