धक्कादायक संशोधन! गर्भवती महिलांमध्ये 'या' तीन महिन्यांत गर्भपाताचा धोका, आणखीही खुलासे By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 4:36 PM1 / 10गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज (Miscarriage ) हा कोणत्याही स्त्रीला शारीरिक आणि मानसिक वेदना देणारा अनुभव असतो. अनेक महिलांचा वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भपात होऊ शकतो. बऱ्याचदा प्रेग्नन्सीमधील गुंतागुंतींमुळे महिलांचा गर्भपात होतो. 2 / 10अमेरिकन संशोधकांच्या एका टीमने आठ वर्षांच्या अभ्यासादरम्यान 6,000 महिलांच्या गर्भधारणेला ट्रॅक केलं. त्यांच्या अभ्यासात गर्भपातासंबंधीत अनेक बाबी उघडकीस आल्या. 3 / 10त्यातली महत्त्वाची म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत गर्भपात होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यातील जास्त उष्णता (Heat) आणि लाईफस्टाईल (Lifestyle) यामुळे गर्भपात होण्याची शक्यता बळावते. परंतु, त्यासाठी अजून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.4 / 10दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गर्भपात होण्याचं प्रमाण फेब्रुवारीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी जास्त असल्याचं आढळून आलं आहे. गरोदर महिलांमध्ये गर्भपाताची बहुतेक प्रकरणं गर्भधारणेचे 8 आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच दिसून आली. यादरम्यान, गर्भाचा आकार रसभरी या छोट्या फळाएवढा असतो.5 / 10बोस्टन युनिव्हर्सिटीतील (Boston University) या अभ्यासाच्या लेखिका डॉ. अमेलिया वेसेलिंक म्हणाल्या, 'उन्हाळ्यात लवकर गर्भपात होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो, असं आम्हाला अभ्यासादरम्यान आढळलं. उष्णतेमुळे गर्भधारणेदरम्यान वेळेआधी बाळ जन्माला येणं, बाळाचं वजन कमी असणं किंवा गर्भातच बाळाचा मृत्यू होणं, अशा इतर अनेक समस्यांचा धोका उन्हाळ्यात वाढतो.”6 / 10संशोधकांनी गर्भपाताचा डेटा दिलेल्या महिलांच्या सर्वेक्षण डेटाचं विश्लेषण केलं. यामध्ये प्रसूतीसाठी किती वेळ शिल्लक असताना गर्भपात झाला, याबद्दल महिलांनी सांगितलं होतं.7 / 10संशोधकांनी या रिसर्चमध्ये अशा महिलांचा समावेश केला ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत होत्या. या गर्भवती महिलांची प्रसूती होईपर्यंत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती.8 / 10दरम्यान, या संशोधनाचे निष्कर्ष एपिडेमिऑलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधनानुसार, गर्भधारणेच्या कोणत्याही आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका फेब्रुवारीच्या अखेरच्या तुलनेत ऑगस्टच्या शेवटी 31 टक्क्यांनी जास्त होता.9 / 10ज्या गर्भवती महिला जास्त उष्णतेच्या ठिकाणी राहतात, त्यांच्यामध्ये गर्भपाताचा धोका खूप जास्त असतो, असं तज्ज्ञ सांगतात. परंतु, वातावरणातील उष्णता गर्भधारणेवर परिणाम करू शकते का? याबद्दल तज्ज्ञांकडे खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. 10 / 10मात्र, उष्णतेमुळे गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने नाळेच्या विकासावर वाईट परिणाम होतो, तसंच गर्भाशयातील रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचं ते सांगतात आणखी वाचा Subscribe to Notifications