The risk of TB due to corona?
कोरोनामुळे ‘टीबी’चा धोका? By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:50 PM1 / 8कोरोनातून बरे झालेल्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच आता क्षयरोगाची (टीबी) भर पडली आहे. देशभरातही अशा प्रकारचे रुग्ण निदर्शनास येण्याची शक्यता आहे. 2 / 8कर्नाटकात क्षयरोगाचे २४ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने आता दारोदारी जाऊन २८ लाख लोकांचे सर्वेक्षण करत टीबी चाचण्या करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 3 / 8टीबीला रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. टीबी डायग्नोस्टिक लॅब्सही केंद्राकडून सुरू करण्यात आल्या. तसेच घरोघरी टीबीप्रतिबंधक औषधांचे वाटप करण्यात आले. 4 / 8आताही कोरोनाग्रस्तांना टीबी होऊ नये याची खबरदारी घेण्याचा सल्ला केंद्राने सर्व राज्यांना दिला असून त्यानुसार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 5 / 8कोरोनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे टीबी होण्याचा धोका वाढतो. कोरोनावरील उपचारांदरम्यान स्टेरॉइड्स आणि इतर काही प्रबळ औषधांचा वापर करण्यात आला. 6 / 8त्यामुळे संबंधितांच्या रोग प्रतिकारशक्तीवर दीर्घकाळपर्यंत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये टीबीची लक्षणे आढळून येण्याची शक्यता वाढली आहे. 7 / 8कोरोना आणि टीबी हे दोन्ही आजार फुफ्फुसांशी संबंधित आहे. त्यामुळेही कोरोनानंतर टीबी होण्याचा धोका आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही श्वसनाशी संबंधित त्रास तसेच खोकला कायम राहतो. 8 / 8लाँग कोव्हिड आणि टीबी यांची लक्षणे एकसमान आहेत. टीबीवरील औषधे वेळच्यावेळी न घेतल्यास त्यांचा परिणाम होणार नाही. गंभीर स्वरूपाचा कोरोना ज्यांना होऊन गेला आहे त्यांच्यात टीबी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications