शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय RSV व्हायरस; डोळे, नाक, तोंडातून शिरतो शरीरात, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 1:02 PM

1 / 10
जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना विविध आजार डोकं वर काढत आहेत. नवनवीन व्हायरस सातत्याने समोर येत आहेत. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. तुम्ही RSV व्हायरसचं नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, परंतु हा एक अतिशय धोकादायक व्हायरस आहे. कारण तो खूप वेगाने पसरतो आहे.
2 / 10
RSV व्हायरसमुळे अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली असून त्यानंतर सर्व आरोग्य संस्था या व्हायरसवरील लस शोधण्यात गुंतल्या आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी फायझर आणि जीएसके यांनी RSV व्हायरसची पहिली लस बनवणार असल्याचा दावा केला असून ती लवकरच बाजारात येणार असल्याची आशा आहे.
3 / 10
CDC नुसार, RSV व्हायरसचं पूर्ण नाव ह्यूमन रेस्पिरेटरी सीनसीटियल व्हायरस (Human Respiratory Syncytial Virus) असं आहे. जो डोळे, नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. हा सर्वप्रथम रुग्णाच्या फुफ्फुसावर आणि श्वसनलिकेवर हल्ला करतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
4 / 10
मायोक्लिनिक च्या मते, RSV व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 4 ते 6 दिवसांनी याची लक्षणे दिसू लागतात. त्‍यामुळे RSV ची 6 सामान्य लक्षणे सुरुवातीला दिसतात. यामध्ये नाक बंद होणं, नाक गळणं, कोरडा खोकला, सौम्य ताप, घसा खवखवणे, शिंका येणे आणि डोकेदुखी याचा समावेश आहे.
5 / 10
MyoClinic सांगते की, जेव्हा श्वसनमार्गाच्या खालच्या भागावर रेस्पिरेटरी सीनसीटियल व्हायरस आघात करतो तेव्हा 5 गंभीर लक्षणे दिसतात. जसे की, खूप ताप, जास्त खोकला, श्वास सोडताना शिट्टीसारखा आवाज, श्वास घेण्यात अडचण आणि शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा निळी पडणे.
6 / 10
Pfizer आणि GSK ने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आणि नवजात बाळांसाठी सर्वात आधी RSV लस बनवणार असल्याचा दावा केला आहे. कारण व्हायरस दोघांनाही आधी जाळ्यात ओढतो, पुढे ते जीवघेणं ठरू शकतं. मात्र या लसीला FDA कडून मंजुरी मिळणे बाकी आहे. नवजात बाळ 2 वर्षांचे होईपर्यंत त्यांना या व्हायरसचा जास्त धोका असतो.
7 / 10
रेस्पिरेटरी सीनसीटियल व्हायरस (RSV) च्या प्रसाराची पद्धत इतर कोणत्याही फ्लू किंवा कोरोना व्हायरस सारखीच आहे. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा व्हायरसचे कण हवेत पसरतात. निरोगी व्यक्ती आणि ठिकाण त्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग होतो. त्यानंतर ते निरोगी व्यक्तीच्या डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात जातं.
8 / 10
अमेरिकेमधील टेक्सास येथे RSV व्हायरसची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. त्यामुळे तेथील बालरुग्णालयात रिकामे बेड उपलब्ध होणं कठीण झालं आहे. त्याचवेळी, TOI च्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबर 2022 च्या सुरुवातीला भारतात RSV प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. चेन्नईतील अनेक मुलांमध्ये RSV व्हायरसची लक्षणे दिसून आली.
9 / 10
सीडीसीच्या मते, RSV व्हायरससाठी कोणताही निश्चित उपचार नाही. त्याची लक्षणे दूर करण्यासाठी सपोर्टिव्ह काळजी घेतली जाते. अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टीरियल औषधे घेणे, IV फ्लूड, ह्युमि़डिफाइड ऑक्सिजन इत्यादी. तथापि, काही खबरदारी घेतल्यास RSV व्हायरसचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
10 / 10
साबणाने हात नीट आणि अनेक वेळा धुवा. आपले तोंड आणि नाक मास्कने झाकून ठेवा. आजूबाजूचा परिसर साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा. धुम्रपान करू नका. लहान मुलांची खेळणी पूर्णपणे नीट स्वच्छ करा. चिमुकल्यांना आजारी व्यक्तीजवळ जाऊ देऊ नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य