शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खुशखबर! एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची सुरक्षित अन् प्रभावी लस मिळणार, अमेरिकन तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:19 PM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या लसीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन समोर येत आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनची लस मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. अमेरिकेतील माहामारी रोग विशेषज्ञ आणि प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञ डॉ. एंथनी फाऊची यांनी सांगितले की, सुरक्षित आणि प्रभावी कोरोनाची लस २०२१ च्या अप्रिल महिन्यापर्यंत येऊ शकते.
2 / 10
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फाऊची यांनी सांगितले की, नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत कोणती लस सुरक्षित आहे. याचा शोध संशोधकांद्वारे घेतला जाईल. याची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर लाखो डोज तयार केले जाऊ शकता. फाऊची यांचा हा दावा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध आहे. कारण ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटापर्यंत १० कोटी लसीचे डोस तयार होतील.
3 / 10
फाऊची यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षित आणि परिणामकारक लस तयार झाल्यानंतर मोठ्या संख्येने लसी तयार करता येतील. ही लस सुरक्षित ठरल्यास २०२१ च्या तीन महिन्यांमध्ये लस उपलब्ध होऊ शकते.
4 / 10
पुढे त्यांनी सांगितले की, जॉनसन एंड जॉनसन लसीचे ट्रायल थांबवणं हे चांगले संकेत आहेत .यातून दिसून येतं की लस योग्य दिशेने जात आहे की नाही. यातून लोकांच्या सुरक्षेचा विचार केला जातो.
5 / 10
एका स्वयंसेवकावर साईड इफेक्ट दिसून आल्यामुळे जॉनसन एंड जॉनसन कंपनीने लसीची चाचणी थांबवली होती. याआधीही ऑक्सफोर्डद्वारे विकसित करण्यात आलेल्या लसीचे चाचणीदरम्यान साईड इफेक्ट्स दिसून आले होते. फाऊची म्हणाले की, जेव्हाही लसीचे ट्रायल थांबवले जाते. त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
6 / 10
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता घराच्या खिडक्या, दरवाजे उघड्या ठेवण्याचे आवाहन केलं आहे. जर घरातील कोणतीही व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर घरातही मास्क वापरायला सुरूवात करा. असंही फाऊची म्हणाले.
7 / 10
फाऊची यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून पूर्णपणे बरे झाले पण प्रत्येकाचा अनुभव त्यांच्यासारखा असू शकत नाही. ट्रम्प हे भाग्यवान आहेत म्हणून कोरोनातून मुक्त झाले.
8 / 10
पण इतर अनेक लोक असे आहेत. जे आपलं वय आणि वजन यांमुळे कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरत आहेत.
9 / 10
दरम्यान जगातील देशांना पुन्हा आश्चर्यचकित करत रशियाने आणखी एक कोरोनावरील लस तयार केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आल्यानंतर रशियाने ही लस मंजूर केल्याचा दावा केला आहे.
10 / 10
रशियाने १२ ऑगस्टला जगातील पहिली लस स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच मंजुरी दिली होती. आता दुसरी कोरोनावरील लस एपिवॅककोरोना (EpiVacCorona) ला मंजुरी देण्यात आली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाHealthआरोग्य