scientific community slammed russia coronavirus vaccine
मोठ्या लोकसंख्येवर 'मूर्ख'पणाचा प्रयोग, रशियन लशीबाबत वैज्ञानिकांचे खडे बोल By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:35 PM1 / 12कोरोनावर यशस्वी लस बनविल्याच्या रशियाच्या दाव्यावर वैज्ञानिकांनी जोरदार टीका केली आहे. तज्ज्ञांनी रशियाच्या या प्रयोगाला 'निष्काळजी आणि मूर्ख'पणाचे वर्तन असे वर्णन केले आहे. 2 / 12रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे म्हणणे आहे की, या लसीची चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या एका मुलीलाही ही लस देण्यात आली आहे. 3 / 12ऑक्टोबरपासून रशिया मोठ्या प्रमाणात लोकांना ही लस टोचणार आहे. शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार रशिया करत असलेलं धाडस योग्य नाही. योग्यप्रकारे चाचणी न घेतलेल्या लसींचा लोकांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.4 / 12जागतिक आरोग्य संघटनेनेही रशियन लसीला मान्यता दिलेली नाही. परंतु रशियाचा असा दावा आहे की, 20 देशांनी त्यांनी तयार केलेल्या लशीच्या लक्षावधी डोसची ऑर्डर दिली आहे. 5 / 12युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रान्सोइस बॉलॉक्स म्हणाले की, रशियाचं हे पाऊल 'बेदरकार आणि मूर्ख'पणाचे आहे. रशियन लशीचे दोन धोकादायक परिणाम होतील.6 / 12एकाचा लोकसंख्येवर वाईट परिणाम होईल, दुसरे म्हणजे लोक लस स्वीकारण्यास घाबरतील. मेट्रो डॉट कॉमच्या एका अहवालानुसार, साऊथॅम्प्टन विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ रिसर्चर मिशेल हेड म्हणाले की, रशियन लस प्रत्यक्षात कशी आहे हे अस्पष्ट आहे. 7 / 12कोणतीही लस मोहीम राबवण्यापूर्वी खरी माहिती जनतेसमोर ठेवणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून लोकांचा विश्वास वाढू शकेल. नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि एपिडेमिओलॉजिस्ट कीथ नील म्हणाले की, काही लोकांवर केलेल्या चाचण्यांमधून ही लस सुरक्षित असल्याचे दिसून येते.8 / 12परंतु संसर्ग रोखण्यासाठी जास्त मोठी चाचणी आवश्यक आहे. जोपर्यंत रशियाकडून विश्लेषणासाठी वैज्ञानिक कागदपत्रे प्रकाशित केली जात नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याबद्दल समजू शकत नाही. 9 / 12लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील रोगप्रतिकारकशास्त्राचे प्रोफेसर डेनी ऑल्टमन म्हणतात की, लस मंजूर करण्यासाठी निकष मूलत: पुरेसे उंचावलेले आहेत. 10 / 12जर लस सुरक्षित आणि प्रभावी नसेल तर सध्याची समस्या लक्षणीयरीत्या वाढेल. आम्ही आशा करतो की, रशियानं लशीचे हे निकष पूर्ण केलेले असतील.11 / 12ब्रिटनमधील वारविक बिझिनेस स्कूलचे औषध संशोधनतज्ज्ञ इफर अली म्हणतात की, वेगवान मंजुरी म्हणजे लशीच्या संभाव्य दुष्परिणामांची चौकशी करणे बाकी आहे. 12 / 12जेव्हा लशीमध्ये समस्या उद्भवतात तेव्हा समान गोष्ट बर्याच वेळा घडतात, व्हायरस सहजपणे शरीरात प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीस अधिक आजारी बनवतो. आणखी वाचा Subscribe to Notifications