शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोज आंघोळ करण्याचे 'हे' साइड इफेक्ट्स तुम्हाला माहीत नसतील, इम्यूनिटीवरही होतो वाईट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 10:23 AM

1 / 8
बालपणापासूनच आपल्याला रोज आंघोळ करण्याची आणि शरीर व्यवस्थीत स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. वयोवृद्ध लोक सांगतात की, आंघोळ केल्याने मनुष्याला होणारे आजार कमी होतात. मात्र, वैत्रानिकांनी याबाबत काही वेगळंच सांगितलं आहे. एक्सपर्ट सांगतात की, रोज आंघोळ करणं अनेक दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतं.
2 / 8
हॉर्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, सामान्यपणे हेल्दी स्कीन त्वचेवर नैसर्गिक ऑइलचा थर आणि गुड बॅक्टेरियाचं संतुलन ठेवण्याचं काम करते. आंघोळ करताना त्वचा घासल्याने किंवा स्वच्छ केल्याने या दोन्ही गोष्टी निघून जातात. याबाबत गरम पाण्याने तर आणखीन जास्त नुकसान होतं.
3 / 8
एक्सपर्ट सांगतात की, आंघोळ केल्यावर मनुष्याची खडबडीत आणि रखरखीत त्वचाही बाहेरील बॅक्टेरिया आणि एलेर्जेसला निमंत्रण देते. याने स्कीन इन्फेक्शन किंवा एलेर्जिक रिअॅक्शनचा धोका आणखी वाढतो. यामुळे डॉक्टर लोकांना आंघोळ केल्यावर स्कीन क्रीमचा वापर करण्याचा सल्ला देतात.
4 / 8
शरीरात अॅंटीबॉडी तयार करणे आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी आपल्या इम्यून सिस्टीमला निश्चित प्रमाणात कॉमन बॅक्टेरिया, घाण आणि सूक्ष्म जीवांची आवश्यकता असते. यामुळेच डॉक्टर आणि डर्मटोलॉजिस्ट लहान मुलांना रोज आंघोळ करण्याचा सल्ला देत नाहीत. पुन्हा पुन्हा आंघोळ केल्याने आपल्या इम्यून सिस्टीमची क्षमता कमी होऊ शकते.
5 / 8
ज्या अॅंटी बॅक्टेरिअल शाम्पू आणि साबणाचा आपण वापर करतो तेही आपल्या गुड बॅक्टेरियाला मारू शकतात. हॉर्वर्ड हेल्थनुसार, याने त्वचेवरील बॅक्टेरियाचा बॅलन्स खराब होतो. याने कमी फ्रेन्डली बॅक्टेरिया तयार होण्याचा धोका वाढतो. हे अॅंटी बायोटिक औषधांप्रति अधिक प्रतिरोधी असतात.
6 / 8
अमेरिकेच्या प्रसिद्ध डर्माटोलॉजिस्ट डॉ. लॉरेन प्लॉच यांच्यानुसार, स्कीनशी संबंधीत समस्यांनी झगडत असलेले लोक किंवा फार जास्त ड्राय स्कीन असणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त ५ मिनिटांपर्यंतच आंघोळ करावी. अशा लोकांना एकदा एक मिनिटापेक्षा जास्त वेळ शॉवरखाली उभे राहू नये. असं करणं केसांसाठी आणि स्कीनसाठी नुकसानकारक ठरू शकतं.
7 / 8
NBC News च्या रिपोर्टनुसार, गरम पाणी शरीराच्या नैसर्गिक ऑइलला जास्त वेगाने नष्ट करतं आणि याने स्कीनही अधिक वेगाने डॅमेज होते. हे सर्कुलेशन बॅलन्स करण्यासाठी अनेक लोक एकतर फार जास्त थंड पाण्याने किंवा जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात. मात्र, मुळात तापमानाच्या हिशेबाने आपण पाण्याचा वापर केला पाहिजे.
8 / 8
रिपोर्टनुसार, जर तुम्हाला स्कीनशी संबंधित कोणतीही समस्या नसेल तर तुम्ही नियमितपणे साबणाचा वापर करू शकता. पण जर तुमच्या स्कीनवर ड्रायनेसची समस्या आहे तर साबणाचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण साबणामुळे आपल्या स्कीनवरील नैसर्गिक ऑइल निघून जातं. ज्याने ड्रायनेसची समस्या अधिक वाढते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स