शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 2:10 PM

1 / 9
निरोगी राहायचे असेल तर कोणत्याही ऋतूत भरपूर पाणी प्या. मात्र उन्हाळ्यात थोडं जास्त पाणी प्यावं कारण उष्णता वाढल्याने शरीराला पाण्याची आवश्यकता असते.
2 / 9
अशा परिस्थितीत शरीराला थंड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही कडक उन्हातून घरी परतला असाल तर लगेचच पाणी पिऊ नका. किती वेळानंतर पाणी प्यावं हे जाणून घेऊया...
3 / 9
उन्हाळ्यात खूप थंड पाणी पिणं टाळावं. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून वेळोवेळी पाणी पिणं फार महत्वाचं आहे. पण त्याच वेळी, घरी परतल्यानंतर लगेचच पाणी पिणं टाळण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्टनी दिला आहे.
4 / 9
उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहिल्याने डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वेळोवेळी पाणी पीत राहणं गरजेचं आहे. कडक उन्हातून परतल्यावर लगेच पाणी पिऊ नका कारण यामुळे सर्दी-खोकल्याचा होतो.
5 / 9
उन्हातून घरी आल्यावर काही वेळ सामान्य तापमानात बसा. शरीराचे तापमान सामान्य झाल्यावरच पाणी प्या. उष्ण वातावरणातून घरी आल्यावर लगेच पाणी प्यायल्यास सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो.
6 / 9
जास्त वेळ उन्हात राहिल्यास तेथून परतल्यानंतर 15 मिनिटांनीच पाणी प्या. उशिराने पाणी प्यायल्यास सर्दी, संसर्ग आणि चक्कर येण्याचा धोका नाही.
7 / 9
कडक उन्हातून परतल्यावर खूप थंड पाणी पिऊ नये. यामुळे ताप, उलट्या, सर्दी, खोकला होऊ शकतो. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
8 / 9
उन्हातून परतल्यानंतर काही काळ विश्रांती घ्यावी. शरीर थंड झाल्यावरच पाणी प्या. साधं आणि कोमट पाणी प्या, यामुळे तुमचे शरीर नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते.
9 / 9
थोडं थोडं पाणी पीत राहा. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. त्याऐवजी, लहान घोट घेऊन पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळतं. आरोग्यविषय समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी