शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shravan Diet 2024: श्रावणात 'हे' आठ पदार्थ भरून काढतील तुमची प्रोटीनची कमतरता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 9:48 AM

1 / 9
अलीकडे वजन वाढ असो नाहीतर वजन कमी करणे असतो, स्वास्थ्यासाठी प्रोटीन शेक घेण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मांसाहारातून ती उणीव भरली जाते. परंतु शाकाहारी लोकांसाठी किंवा श्रावण पाळणाऱ्यांसाठी यावर उपाय काय? तर नैसर्गिक रित्या प्रोटीन स्रोत असलेल्या पदार्थांचे सेवन करणे. पण प्रोटीनचे सेवन नेमके करायचे तरी किती? तर आपल्या वजनाच्या ०.८ ग्रॅम! म्हणजेच जर आपले वजन ७५ किलो असेल तर आपण ६० ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजे. या हिशोबाने पुढे दिलेले पदार्थ १०० ग्रॅम प्रमाणात जरी सेवन केले तरी त्यातून किती ग्रॅम प्रोटीन मिळते ते बघा आणि त्या हिशोबाने तुमचा डाएट ठरवा.
2 / 9
मूग - मूग डाळीमध्ये फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात. मूग हे वनस्पती-आधारित प्रथिने आणि फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठता टाळतात. मुगाच्या डाळीमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मुगाच्या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, मूग हळूहळू रक्तप्रवाहात साखर सोडते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही डाळ आरोग्यदायी पर्याय बनतो, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांना मुगाच्या डाळीचा खूप फायदा होऊ शकतो. मुगातील लोह अशक्तपणापासून बचाव करण्यास मदत करते. आणि प्रथिने गर्भाच्या वाढीस पूरक असतात. १०० ग्रॅम मुगात २४ ग्रॅम प्रोटीन असते.
3 / 9
सोयाबीन - सोयाबीन हा आहारातील एक महत्वपूर्ण घटक आहे. त्याचा उपयोग आहारात केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तसेच ते आपल्या चेहऱ्याचीही खास काळजी राखणे. सोयाबीनचा उपयोग जेवढा आरोग्याला होतो तेवढाच त्याचा उपयोग त्वचेलाही होतो. सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. लांब केस हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन केले तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. हाडांच्या मजबुतीसाठी, वजन नियंत्रित राहण्यासाठी, मधुमेहींसाठी सोयाबीन वरदान आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅम प्रोटीन असते.
4 / 9
शेंगदाणे - शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, व हेल्दी फॅट्स आढळतात. त्यामुळे नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शारीरिक आरोग्यापासून मानसिक, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय पचनसंस्था सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, त्वचा सुंदर होते. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये २६ ग्रॅम प्रोटीन असते.
5 / 9
फुटाणे - फुटाण्यामध्ये प्रथिने, फोलेट, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर सारखे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हे गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहून वजन कमी करण्यातही मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मधुमेह नियंत्रित राहतो. रक्तशुद्धी होते. पचन व्यवस्थित होते. १०० ग्रॅम फुटाण्यांमध्ये २१ ग्रॅम प्रोटीन असते.
6 / 9
मिल्क ओट्स - दुधासह ओट्स हा सोपा आणि उत्तम नाश्ता आहे; शिवाय हे पौष्टिक खाद्य आहे. यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. वजन व्यवस्थापन, हृदयाचे आरोग्य नियंत्रित ठेवणारा हा आहार आहे. शिवाय तो झटपट बनतो. वेळ वाचवतो. प्रतिकार शक्ती वाढवतो. १०० ग्रॅम मिल्क ओट्समध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते.
7 / 9
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे तृप्ति वाढण्यास आणि एकूण कॅलरीजचे सेवन कमी करण्यास मदत होते. फायबर पचनास मदत करते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटून जास्त खाणे टाळण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, भोपळ्याच्या बियांमधील निरोगी चरबी चयापचय आरोग्यास समर्थन देतात आणि वजन व्यवस्थापनास मदत करतात. १०० ग्रॅम बियांमध्ये १९ ग्रॅम प्रोटीन असते.
8 / 9
पनीर - पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. जे आपल्याला हाडे तयार करण्यास मदत करते. हाडे मजबूत करते. जे ऍलर्जीमुळे दूध पिऊ शकत नाहीत. त्यांनी आपल्या आहारामध्ये नक्कीच पनीरचा समावेश करायला हवा. महिला असो वा लहान मुले सर्वांनीच आहारामध्ये पनीर घ्यावे. पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. हे आपल्याला आपल्या त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यास मदत करते. १०० ग्रॅम पनीरमध्ये १९ ग्रॅम प्रोटीन असते.
9 / 9
दही - दही पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्वे, इतर आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असते. दही हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे जे वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकते. दही जळजळ कमी करण्यासही मदत करते. रोजच्या जेवणात दह्याचा समावेश असला तर आरोग्य उत्तम राहण्यास व प्रकृती, मन शांत राहण्यास मदत मिळते. १०० ग्रॅम दह्यामध्ये ११ ग्रॅम प्रोटीन असते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्न