शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उभं राहून पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, लगेच बदला ही सवय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:15 PM

1 / 7
How To Drink Water: तुम्ही नेहमीच घरातील वयोवृद्धांकडून ऐकलं असेल की, उभं राहून पाणी पिऊ नये. पण सामान्य बाब समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. कधी कुणी सांगितलेलं अचानक आठवलं तरी आपण बसून पाणी पित नाही. पण असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण हे उगाच सांगितलं जात नाही, त्यामागे वैज्ञानिक कार आहे.
2 / 7
उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक म्हटलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.
3 / 7
बसून का प्यावं पाणी? - पाणी पिण्यासाठी बसण्याची पोजिशन सर्वात योग्य आहे. अशाप्रकारे पाणी प्यायलात तर पचन योग्यप्रकारे होतं. जेव्हा कुणी बसून पाणी पितं तेव्हा ते आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचतं. पाणी कोशिकांपर्यंत पोहोचून टॉक्सिन शरीरातून बाहेर काढतं. तसेच पाण्याचं अवशोषण चांगल्याप्रकारे झालं तर रक्तही साफ होतं. शरीर फीट राहतं.
4 / 7
किडनीची समस्या - उभं राहून पाणी पिणं आपल्या किडनीसाठी नुकसानकारक आहे. कारण उभं राहून पाणी पिलात तर ते ब्लड सेल्सपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि रक्तात विषारी पदार्थ वाढतात. किडनी रक्तातील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी लघवी तयार करते. जास्त अशुद्धी असल्याने किडनीचं काम वाढतं. त्यामुळे किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.
5 / 7
पचनक्रिया प्रभावित होते - उभं राहून पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचतं. याने ग्रासनळीत समस्या होऊ शकते. अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत राहते. याने पचनासंबंधी समस्या होत नाहीत.
6 / 7
श्वसनावर वाईट परिणाम - उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या अन्ननलिकेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या श्वासनलिकेत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही. त्यामुळे श्वसन तंत्र आणि फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. याने हार्ट प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता असते.
7 / 7
संधीवाताची समस्या - उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्याचं प्रेशर पोटाच्याही खाली जाऊन थांबतं. ज्यामुळे हाडं आणि जॉइंट्सवर वाईट परिणाम होतो. सोबतच हाडे कमजोर होणं सुरू होतं. अशात कमजोर हाडांमुळे संधिवातसारखी समस्या होण्याचीही शक्यता असते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य