शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आईसक्रीम तेही पावसाळ्यात खाताय? मग तोटे जाणून घ्याच, पडाल गंभीर आजारांना बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 7:57 PM

1 / 10
आईस्क्रीम हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. लहान मुले असोत की वयस्कर व्यक्ती सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्यात तर लोक खूप जास्त प्रमाणात आईस्क्रीम खातात
2 / 10
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे एकवेळ फार त्रासदायक होणार नाही. मात्र पावसाळ्यात जर तुम्ही आईस्क्रीमची सेवन करत असाल तर सावध राहा.
3 / 10
कारण पावसाळयात आईस्क्रीम खाणे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात आईस्क्रीम खाण्याचे काही दुष्परिणाम सांगणार आहोत.
4 / 10
छाती जड होणे : पावसाळ्यात वातावरणात गारवा वाढतो. या काळात असे पदार्थ खाणे टाळावे. ज्यामुळे शरीराला ऊब मिळते. आईस्क्रीमचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, छाती जड होणे यासारख्या समस्या उद्भवतात. पावसाळ्यात तुम्हाला गोड खायचे असेल तर तुम्ही इतर कोणतीही मिठाई योग्य प्रमाणात खाऊ शकता.
5 / 10
घसा खराब होणे : घशासाठी आइस्क्रीमचे सेवन कोणत्याही ऋतूमध्ये चांगले मानले जात नाही. आईस्क्रीम खाल्यामुळे घासा बसतो किंवा खराब होतो. आपला आवाज बदलालतो. त्यामुळे आवाजाचे काम करणाऱ्या लोकांनी आईस्क्रीम कोणत्याही ऋतूत खाऊ नये.
6 / 10
वाढू शकते वजन : आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज, फॅट असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ले तर जास्त कॅलरीज शरीरात जातात, जे वजन वाढवण्याला कारणीभूत ठरतात.
7 / 10
वाढू शकते वजन : आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज, फॅट असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ले तर जास्त कॅलरीज शरीरात जातात, जे वजन वाढवण्याला कारणीभूत ठरतात.
8 / 10
डोकेदुखी : पावसाळ्यात आईस्क्रीम खाल्याने मेंदू फ्रिज होऊ शकतो आणि मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांनी पावसाळ्यात आईस्क्रीम खाणे टाळावे.
9 / 10
पचनक्रिया कमकुवत होणे : पावसाळ्यात संसर्ग आणि आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आपण अशा पदार्थांचे सेवन करतो ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पण पावसाळ्यात आईस्क्रीमचे सेवन केल्यास अली पचनक्रिया कमकुवत होऊ शकते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
10 / 10
साखरेची पातळी वाढू शकते : आईस्क्रीममध्ये भरपूर साखर असते. त्यामुळे आईस्क्रीम खाल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेहींनी आईस्क्रीमचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
टॅग्स :Healthआरोग्य