side effects of over eating tomatoes
Health tips: टॉमेटोचे फायदे माहित असतील आता दुष्परिणामही जाणून घ्या...आहेत अत्यंत घातक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 10:58 AM1 / 8टोमॅटो खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असतील, आज आपण साईड इफेक्टबाबत जाणून (Side effects of Eating Tomatoes) घेऊया.2 / 8टोमॅटोचे जास्त सेवन केल्यास पोटाशी संबंधित अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने कोणते नुकसान होऊ शकतात.3 / 8अॅसिड रिफ्लेक्सची समस्या भेडसावू शकते, कारण टोमॅटोमध्ये मास्टर अॅसिड आणि सायट्रिक अॅसिड असल्यामुळे ते खूप अम्लीय बनते. याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होण्याची लक्षणे दिसू शकतात.4 / 8जास्त टोमॅटो खाणे देखील आपल्या किडनीसाठी सुरक्षित नाही. त्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.5 / 8टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सांधेदुखी आणि सांध्यांना सूज येऊ शकते. संधिवाताच्या रुग्णांसाठी याचा खूप त्रास होऊ शकतो. 6 / 8जर तुम्ही जास्त संवेदनशील असाल तर टोमॅटो खाण्याने अतिसार देखील होऊ शकतो.7 / 8पचनाशी संबंधित काही इतर लक्षणे देखील दिसू शकतात, जसे की पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे इ.8 / 8टोमॅटोच्या बिया पोटात विरघळत नाहीत. जरी केचपमधील बिया काढून टाकलेल्या असल्या तरी त्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते. केचप खूप खाण्यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. मूत्राशयातून याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्याचा ताण तुमच्या किडनीवर येतो. सहाजिकच टोमॅटो आणि केचप अती प्रमाणात खाणाऱ्या लोकांना किडनीच्या समस्या जाणवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications