simple and natural home remedies for glowing skin
चेहरा उजळवण्यासाठी 'हे' उपाय करा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 8:46 PM1 / 5सर्व महिलांची आपलं सौंदर्य जपण्यासाठी धडपड सुरू असते. पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रिटमेंट करण्यात येतात. तर अनेक थेरपींचा आधार घेण्यात येतो किंवा बाजारात मिळणारी उत्पादनं वापरण्यात येतात. मात्र, आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर केल्यामुळे तुम्हाला त्वचा उजळवण्यास मदत होईल.2 / 51. गुलाब पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं केल्याने तुमची त्वचा उजळवण्यास मदत होईल. 3 / 52. एक कप मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. अर्धा तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने तुम्हाला इस्टंट ग्लो मिळेल, तसेच यामुळे त्वचेला कोणतेही साइड इफेक्ट्स होणार नाहीत. 4 / 53. डाळिंबाच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 1 तासानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. डाळिंब आणि लिंबामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आणि अॅन्टीऑक्सिडंट अस्तित्वात असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासोबतच त्वचा उजळवण्यासही मदत करतात.5 / 54. जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स येत असतील तर त्यावर पपईचा वापर करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कच्च्या पपईचा रस चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने धुवून टाका. असं केल्याने पिंपलची समस्या दूर होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications