शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मनुष्य जास्तीत जास्त किती जगू शकतात, वैज्ञानिकांनी केला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:37 AM

1 / 9
तुम्ही सर्वात जास्त वय असलेल्या व्यक्तीबाबत काय ऐकलं आहे. हेच ना की, ते ११४ वर्ष जगले किंवा ११६ वर्षे जगले. पण मनुष्य जास्तीत जास्त किती वर्षे जिवंत राहू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर आता वैज्ञानिकांनी याचा अंदाज लावला आहे. नेचर कम्यूनिकेशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, मनुष्याचं जास्तीत जास्त वय १५० वर्षे असू शकतं.
2 / 9
सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी खासप्रकारचे इंडिकेटर्स तयार केले. या इंडिकेटर्सला डायनेमिक ऑर्गेनिज्म स्टेट इंडिकेटर म्हणतात. याने हे समजतं की, मनुष्याचं शरीर जास्तीत जास्त किती वयापर्यंत त्याची साथ देऊ शकतं. यासाठी खासप्रकारे रक्ताची टेस्ट करावी लागते.
3 / 9
या वैज्ञानिकांनी रक्ताची टेस्ट केल्यावर त्यांनी तयार केलेल्या इंडिकेटर्ससोबत ते मॅच करून पाहिले. ज्यातून समोर आलं की जर आरोग्य चांगलं राहिलं आणि परिस्थिती मनुष्याच्या शरीराच्या अनुकूल राहिली तर तो व्यक्ती १५० वर्षापर्यंत जिवंत राहू शकते.
4 / 9
वैज्ञानिकांनी वयासंबंधी व्हेरिएबल्स आणि वय घटण्याच्या ट्रॅजेक्टरीला सिंगल मेट्रिकमध्ये टाकलं. याने संभावित जास्तीत जास्त वय समोर येतं. वय वाढण्याला बायोलॉजीच्या भाषेत अशा स्थितीला म्हटलं जातं जेव्हा शरीरातील अवयव काम करतात आणि शरीर आजारांनी संक्रमित होत राहतं. मग तो कॅन्सर असो, मानसिक आजार असो किंवा हृदयरोग असो. दुसरं मोठं कारण म्हणजे शरीराचा DNA चं सतत विभाजन होत जाणं. यामुळे आजार जास्त प्रभाव करतात. त्यामुळे शरीर आणि अवयव साथ देणं सोडतात.
5 / 9
वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे रक्ताचे सॅम्पल घेतले. त्यांचं कम्प्लिट ब्लड काउंड तपासलं गेलं. या टेस्टमध्ये रक्तातील पांढऱ्या पेशी, लाल पेशी आणि प्लेटलेट्सचं प्रमाण समजतं. घटत्या वयाची ट्रॅजेक्टरी आणि CBC ची आकडेवारी मिळून पाहिलं तर समजलं की, कोणत्या वयात कोणता संभावित आजार काय प्रभाव करू शकते. सोबतच शरीर किती प्रकारच्या आजारांसोबत संघर्ष करू शकतो.
6 / 9
हे इंडिकेटर्स शरीराच्या फिजिकल क्षमता दर्शवतात. ज्या लोकांची लाइफस्टाईल चांगली नाही त्यांचा DOSI हे सांगतो की, ते कमी जगतात. DOSI मध्ये नेहमी गंभीर आजारांशी जोडलं जात नाही. याने सामान्य आजारांच्या आधारावरच शरीराच्या वयाची माहिती मिळते. याने समजतं की, मनुष्याचं शरीर कोणत्या दिशेने जात आहे. ते किती दिवस निरोगी राहू शकतं. जर एखाद्या व्यक्तीला काहीच आजार नसेल आणि त्याची लाइफस्टाईल चांगली असेल तर ती व्यक्ती जास्त काळ जगू शकते.
7 / 9
जेव्हा वैज्ञानिकांनी निरोगी लोकांची टेस्ट केली तर समजलं की, त्यांचा DOSI भविष्या होणाऱ्या संभावित आजारांबाबत तर सांगू शकतो, पण वर्तमानात कोणत्याही आजाराचा इशारा देऊ शकत नाही. कारण त्यांच्या जगण्याची पद्धत चांगली आहे. नंतर वैज्ञानिकांनी DOSI चा स्तर वाढवून पाहिलं. जेणेकरून संभावित वयाचं माहिती मिळवता येईल. कारण DOSI वाढत्या वयासोबत वाढतो.
8 / 9
DOSI आणि वाढत्या वयाचा आपसातील संबंध हे दर्शवतो की, जर शरीराचे सर्व अवयव संतुलित प्रकारे काम करत असतील. कोणताही गंभीर क्रॉनिक आजार नसेल. लाइफस्टाईल योग्य असेल तर मनुष्य १२० ते १५० वर्षापर्यंत जगू शकतात. वैज्ञानिकांनी असंही सांगितलं की, भविष्यात कितीही टेक्निक आल्या तरी वाढतं वय कमी केलं जाऊ शकत नाही.
9 / 9
वाढत्या वयासोबत शरीराची फिजिकल आणि एनाटॉमिकल म्हणजे बाहेरील व आतील क्षमता कमी होते. यावर आणखी घातक ठरतात आजार. आजकाल लाइफस्टाईल संबंधी आजार जास्त होत आहेत. अशात मनुष्याचं सरासरी आयुष्य कमी होत आहे. वय वाढवण्यासाठी कोणतीही थेरपी किंवा टेक्निक कामी येणार नाही. यासाठी मनुष्याने चांगलं जीवन जगण्याची पद्धत शिकली पाहिजे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनsingaporeसिंगापूर