Sitting in cross leg position for long may increase back pain api
Cross Leg करून बसणं पडू शकतं महागात, कसं ते वाचाल तर कधीच तसं बसणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 10:15 AM1 / 11बॉडी लॅंग्वेज आणि स्टाइलचा विषय आला की, Cross Leg करून बसण्याला सर्वात कॉन्फिडेंट मानलं जातं. या पद्धतीने बसण्यात अनेकांना सहजता वाटते. खासकरून महिला अशाच Cross Leg करून बसतात. या पद्धतीने बसण्यात सहजता वाटत असली तरी याने शरीराचं फार जास्त नुकसान होऊ शकतं. एक्सपर्ट्स सांगतात की, एकावर एक पाय ठेवून बसल्याने ब्लड प्रेशर आणि वेरिकॉज वेन्ससारख्या समस्या होऊ शकतात.2 / 11अनेक हेल्थ रिसर्चमधून हे समोर आले आहे की, एकावर एक पाय ठेवून बसल्याने आपल्या नर्व्सवर दबाव पडतो आणि त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं. अशात बीपीची समस्या असणाऱ्यांनी या पोजिशनमध्ये बसणे टाळले पाहिजे. सोबतच ज्या लोकांना बीपीची समस्या नसेल त्यांनी सुद्धा जास्त वेळ या पोजिशनमध्ये बसू नये. जर ते या पोजिशनमध्ये बसले तर त्यांना अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.3 / 11Cross Leg करून बसल्याने केवळ ब्लड प्रेशरच नाही तर ब्लड सर्कुलेशनवर सुद्धा प्रभाव पडतो. याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एका पायावर दुसरा पाय ठेवून बसता तेव्हा दोन्ही पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन एकसारखं होऊ शकत नाही. या कारणाने पाय सुन्न होणे किंवा पायांना झिणझिण्या येऊ लागतात.4 / 11तसेच क्रॉस लेग पोजिशनमध्ये बसल्याने पेल्विक मसल्स(पोटाखालील भाग)मध्ये असंतुलन होतं. कारण दिवसभर अनेक तास याच पोजिशनमध्ये बसल्याने आपल्या मांड्यांमध्ये ताण, सूज किंवा वेदना होण्याची शक्यता असते.5 / 11सामान्यपणे ऑफिसमध्ये सगळे लोक ८ ते ९ तास खुर्चीवर बसतात. पायांना आराम मिळावा म्हणून अनेकजण क्रॉस लेग करून बसतात. पण या स्थितीत जास्त वेळ बसल्याने पायांचे जॉइंट्स दुखू लागतात. पण अनेकदा हे लक्षात येत नाही की, एक्सरसाइज करूनही आपल्या जॉइंट्समध्ये वेदना का होतात. या वेदनांचं कारण दुसरं काही नसून क्रॉस लेग करून बसणं हे आहे.6 / 11काही लोकांना नेहमीच कंबरेच्या खालच्या भागात वेदना होतात. पण त्यांना याचं कारण माहीत नसतं. क्रॉस लेग करून बसल्याने ही समस्या होऊ शकते याचा ते विचारही करत नाहीत. कारण क्रॉस लेग करून त्यांना तात्पुरता आराम मिळत असतो. मात्र, नियमित असं बसत असाल तर कंबरेच्या खालच्या भागात वेदना होऊ लागतात.7 / 11क्रॉस लेग करून बसू नये याचं आणखी एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे अशा स्थितीत जास्त वेळ बसल्याने पॉल्सी किंव पेरोनिअल नर्व पॅरालिसिसची समस्या होऊ शकते. जर तुम्ही रोज अनेक तास अशाप्रकारे क्रॉस लेग करून बसत असाल तर तुमच्या नर्व्स डॅमेज होऊ शकतात.8 / 11दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम जास्तीत जास्त लोकांना करावं लागतं. पण तुम्हाला आरोग्याशी संबंधित ही समस्या दूर ठेवायची असेल तर अधून-मधून ब्रेक घ्या. दर ४५ मिनिटांनंतर खुर्चीवरून उठून ५ मिनिटे ब्रेक घेऊन फिरा. 9 / 11दिवसभर बसून काम करायचं असेल तर थोड्या थोड्या वेळाने बसायची पोजिशन बदलायला हवी. थोडा वेळ खुर्चीतून उठून उभे रहावे. असं केल्याने बॉडी मुव्हमेंट कायम राहील आणि थकवाही जाणवणार नाही.10 / 11जर तुम्हाला वाटत असेल की, खुर्चीवरून थोड्या वेळासाठी उठून थकवा कसा कमी होईल? तर यावर एक्सपर्ट्स सांगतात की, जेव्हा आपण फार जास्त वेळ बसल्यावर उभे होतो तेव्हा आपलं ब्लड सर्कुलेशन वेगाने होतं. याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं.11 / 11जर तुम्ही एकाच जागेवर क्रॉस लेग पोजिशनमध्ये बसत असाल आणि तुम्हाला आधीच हाय बीपीची समस्या असेल तर याने तुमची स्थिती आणखी खराब होऊ शकते. हे टाळण्यासाठी काम करताना थोडा ब्रेक घ्यावा. आणखी वाचा Subscribe to Notifications