sleep expert has warned why you should never drink coffee within an hour of waking up
सावधान! तुम्ही सकाळी उठल्यावर कॉफी पिता का? लगेचच करा बंद; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:45 AM1 / 9आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन करतात. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. अनेकांना जो पर्यंत वाफाळलेला चहा आणि गरमागरम कॉफी मिळत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात झाली असं वाटतच नाही. 2 / 9काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही समज आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना फ्रेश वाटत नाही, शरीराला ऊर्जा मिळत नाही. मात्र आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.3 / 9तज्ञांच्या मते, झोपेतून उठल्यानंतर एक तासाच्या आत कधीही कॉफी पिऊ नये. जर तुम्हाला वाटत असेल की कॉफीमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते किंवा झोप जाते, तर तसं काही नाही. कॉफी प्यायल्याने वाईट परिणाम होऊ शकतो.4 / 9हॅपी बेड्सचे तज्ज्ञ आणि सीईओ रेक्स इसॅप (Rex Isap) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसा तुमचा मेंदू एडेनोसिन नावाचं एक रसायन तयार करतं जे झोपेला प्रोत्साहन देतं. तुम्ही जास्त वेळ जागे राहिल्याने, हे रसायन वाढतं आणि तुम्हाला झोप येण्यास मदत होते. 5 / 9मात्र कॅफीन एडेनोसिन रिसेप्टर्सना अवरोधित करतं, जे तुम्हाला सतर्क आणि जागृत ठेवतं. जर तुम्हाला कॉफी प्यायल्यानंतर झोपेचा त्रास होत असेल तर हे कारण असू शकतं. पण जेव्हा कॉफी पिण्याची योग्य वेळ येते तेव्हा ती पिण्याआधी किमान तासभर थांबावे लागते. 6 / 9तुम्हाला नैसर्गिकरित्या जागृत ठेवणारे कॉर्टिसोल हार्मोन (स्ट्रेस हार्मोन) कमी होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. अनेक जण जास्त काम असल्यास खूप वेळ जाग राहायचं असल्यास कॉफी पितात. 7 / 9जेव्हा कॉफी पिण्याच्या योग्य वेळेबाबत बोलत असताना रेक्स यांनी स्पष्ट केलं की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिऊ नये कारण जेव्हा आपण उठतो तेव्हा कॉर्टिसोलची पातळी जास्त असते. त्यामुळे जेव्हा तुमची कोर्टिसोलची पातळी आधीच जास्त असते, तेव्हा कॅफीन पिणे त्याविरुद्ध काम करू शकते.8 / 9जेव्हा तुम्ही कॅफिनचे सेवन करता तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन करत नाही ना? हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला झोपेचा त्रास होत असल्यास, dirtyleeping.co.uk चे मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट डॉ. लिंडसे ब्राउनिंग यांनी दुपारी 2 नंतर कॉफी न पिण्याची शिफारस केली आहे. 9 / 9डॉ. लिंडसे ब्राउनिंग म्हणतात, 'एक कप कॉफी प्यायल्यानंतर पाच ते सात तासांनंतरही तुमच्या शरीरामध्ये अर्धे कॅफीन राहते, त्यामुळे तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल, तर तुमची दिवसाची शेवटची कॉफी दुपारी 2 च्या सुमारास घ्या.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications