शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री झोपताना अजिबात करू नका ही चूक, टाळा अनेक गंभीर आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:54 AM

1 / 8
अशी बरीच लोकं आहेत ज्यांना लाइट लावून झोपण्याची सवय असते. तर काही लोकांना झोपताना अंधार हवा असतो. अशात शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीच्या फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनने लाइट लावून झोपणाऱ्या लोकांच्या आरोग्याला होणाऱ्या धोक्याबाबत सांगितलं. अशात या रिसर्चमधून मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांना इशारा देण्यात आला आहे.
2 / 8
रिसर्चमध्ये आढळून आलं की, कोणत्याही प्रकारचा लाइट लावून झोपल्याने इतकंच काय तर डिम लाइटमध्येही झोपल्याने वयस्कांमध्ये लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरची शक्यता वाढू शकते. या रिसर्चचे लेखक नॉर्थवेस्ट मेडिसिन फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. मिंजी किम यांनी एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं की, स्मार्टफोनचा लाइट, रात्रभर टीव्हीचा लाइट किंवा मोठ्या शहरांमध्ये होणारं लाइट पल्यूशन. आपण अशा गोष्टींनी वेढले गेले आहोत जिथे 24 तास लाइट सुरू असतात.
3 / 8
डॉ. किम यांनी मेडिकल न्यूज टुडेला सांगितलं की, एका छोट्या लाइटमधून येणारा प्रकाशही आपल्या शरीराला प्रभावित करतो, ते म्हणाले की, त्यांच्या ग्रुपने याआधी काही रिसर्च केले आहेत, ज्यातून हे समोर आलं आहे की, डिम टाइटमध्ये झोपल्याने हार्ट रेट आणि ग्लूकोज लेव्हल वाढते.
4 / 8
स्वीडनच्या उप्साला यूनिव्हर्सिटीच्या एका स्लीप एक्सपर्ट डॉ. जोनाथन सेडर्नेसने मेडिकल न्यूज टुडेला सांगितलं की, जे वयस्क लोक जास्त वेळ लाइटच्या एक्सपोजर म्हणजे प्रकाशात झोपतात, त्यांना पुढे जाऊन हृदयासंबंधी समस्या, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा इत्यादी आजारांचा सामना करावा लागू शकतो.
5 / 8
याबाबत एक नवा रिसर्च करण्यात आला ज्यात 552 वयस्क महिला आणि पुरूषांची झोप ट्रॅक करण्यात आली. डॉ. किम म्हणाले की, या रिसर्चमध्ये आम्ही 7 दिवसांपर्यंत वयस्क लोकांची झोप आणि लाइट एक्सपोजर मोजलं. हा रिसर्च लॅबमध्ये नाही तर त्यांच्या रूटीन जागांवरच करण्यात आला.
6 / 8
रिसर्चमधून आढळून आलं की, अर्ध्यापेक्षाही कमी लोक कमीत कमी 5 तासांसाठी अंधाऱ्या रूममध्ये झोपतात. तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक लाइटमध्ये झोपतात. डॉ. किम म्हणाले की, हे सगळे लोक झोपताना डिम लाइटमध्ये झोपत होते. यात असं आढळून आलं की, लाइट एक्सपोजरमध्ये झोपणाऱ्या सर्वच लोकांना हाय ब्लड प्रेशरचा धोका 74 टक्के, लठ्ठपणाचा धोका 82 टक्के आणि डायबिटीसचा धोका 100 टक्के आढळून आला.
7 / 8
डॉ. किम यांनी सल्ला दिला की, झोपताना लोकांनी लाइटपासून दूर रहावं. जर कुणाला लाइटमध्ये झोपण्याची सवय असेल तर कमीत कमी लाइटचा वापर करा. ते पुढे म्हणाले की, झोपताना शक्य तेवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर रहा आणि तुमच्या आजूबाजूला जास्त प्रकाश असेल तर स्लीपिंग मास्कचा वापर करा.
8 / 8
तसेच डॉ. किम म्हणाले की, जर तुम्हाला रात्रीच्या वेळी सेफ्टीसाठी लाइट लावायचा असेल तर हा लाइट अशा ठिकाणी ठेवा जिथून प्रकाश थेट तुमच्या डोळ्यांवर पडणार नाही. ते म्हणाले की, रात्रीच्या वेळी रूममध्ये ब्लू लाइटऐवजी लाल लाइटचा वापर करा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य