Sleeping on the floor has many benefits you will surely get good sleep at night effective measures
जमिनीवर झोपण्याचे आहेत भरपूर फायदे, तुम्हालाही लागेल सुखाची झोप... By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 3:44 PM1 / 7Benefits of Sleeping on Floor : दिवसभर काम करून थकून-भागून घरी आल्यावर सुखाची झोप मिळावी अशी साऱ्यांचीच इच्छा असते. अशा वेळी मऊसर गादी असावी असं अनेकांना वाटतं.2 / 7गादीवर झोप छान लागते यात वादच नाही, पण जमिनीवर झोपण्याचे अनेक फायदे आहेत ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया, त्याबद्दल...3 / 7कमरेच्या दुखण्यापासून सुटका - जमिनीवर झोपल्याने कंबर आणि कमरेखालच्या भागाला आराम मिळतो. शरीर एका सरळ रेषेत राहते आणि त्यामुळे सकाळी तुम्हाला स्फूर्ती जाणवते.4 / 7स्पॉन्डिलायटिस पासून आराम - ज्या लोकांना मानेची दुखणी आहेत, त्यांनी जमिनीवर उशी न घेता झोपावे. त्यामुळे मानेच्या स्नायूंना आराम मिळतो आणि दुखणं कमी होतं.5 / 7गारवा जाणवतो - दिवसेंदिवस तापमान वाढ होत आहे. अशातच उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्याने शरीराला गारवा मिळतो आणि सुखाची झोप मिळते.6 / 7तणावापासून मुक्ती - रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपल्याचा ब्रेन हेल्थ साठी चांगला फायदा होतो आणि तणावापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.7 / 7रक्त प्रवाह सुरळीत होतो - जमिनीवर झोपल्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्याचा पर्यायाने हृदयावर आणि मेंदूवरही सकारात्मक परिणाम होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications