smart toilet will analysis your stool and urine to detect diseases
आता टॉयलेटमध्ये बसूनही कळणार तुमचा आजार, शास्त्रज्ञांनी विकसित केलं 'स्मार्ट टॉयलेट' By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 3:52 PM1 / 10जगातलं पाहिलं स्मार्ट टॉयलेट प्रत्यक्षात उपलब्ध झालं आहे. यावर बसणाऱ्या व्यक्तीच्या मुत्राची आणि मलविसर्जनाची तपासण आपोआप होणार2 / 10स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन येथील वैज्ञानिकांनी ही स्मार्ट टॉयलेट (Smart Toilet) तयार केली आहेत. या टॉयलेटमध्ये आपल्या लघवीची तपासणी आपोआप होईल. कॅन्सरपासून इतर गंभीर आजारांचं निदान यातून होऊ शकतं.3 / 10हे एक इंग्लीश टॉयलेट असणार आहे. जी व्यक्ती त्या टॉयलेट सीटवर बसेल तिच्या आरोग्याची तपासणी लगेचच होईल4 / 10स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी आपल्या शरीरातील आजारांचा हा शोध कसा लावला जाणार आहे हे सांगितलं.5 / 10या टॉयलेट सीटवर बसेल त्याच्या मूत्रातून किंवा विष्ठेेतून स्कॅनिंग चाचणी करून त्या माणसाच्या आजाराचा अंदाज बांधता येऊ शकणार आहे.6 / 10फ्यूचारिजमच्या रिपोर्टनुसार, यूरोफ्लोमीटरच्या रूपात कॉम्प्युटर व्हिजनचा वापर करून विष्ठेचं आणि युरिनचं विघटन आणि विश्लेषण होईल.7 / 10या सीटवर बसवण्यात आलेला स्कॅनर माणसाच्या शरीरातील युरीन आणि स्टूल्सचं स्कॅन करेल, कॅन्सर तसेच मानसिक आजार चिडचिडेपणा, यासंबंधी तपासण्या आपोआप होतील. 8 / 10अंतर्गत भागात येणारी सूजदेखील स्कॅनमधून कळू शकेल.9 / 10प्रोस्टेट कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्या लोकांना या टॉयलेटचा जास्त फायदा होणार आहे.10 / 10काही रिपोर्टनुसार, असेही म्हंटले जात आहे की, या स्मार्ट टॉयलेटची मागणी वाढत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications