So the sweetness is called 'jadu ki zappi'
म्हणून मिठीला म्हटले जाते 'जादू की झप्पी' By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 6:06 PM1 / 6स्वागत करताना मिठी मारण्याची प्रथा जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित आहे. मात्र मिठीला 'जादू की झप्पी' का म्हटलं जातं हे माहीत आहे का? खालील स्लाइडमधून जाणून घ्या मिठीला जादू की झप्पी का म्हणतात. 2 / 6हार्मोनल बदल - जेव्हा दोन व्यक्ती गळाभेट घेतात, तेव्हा त्यांच्या शरीरातून ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोन्सचा स्राव होतो. या हार्मोनमुळे तणाव कमी होतो. 3 / 6गळाभेट घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जोव्हा दोन व्यक्ती गळाभेट घेतात तेव्हा त्यांच्या सोलर प्लेक्सस चक्रावर दबाव पडतो, त्यातून शरीरात रक्तपेशींची निर्मिती आणि नियंत्रण करणाऱ्या थायमन ग्लॅडला चालना मिळते. 4 / 6दीर्घकाळ मिठीत राहिल्याने शरीरातील सिरोटीनचा स्तर वाढतो, त्यामुळे खराब मूड सुधारून आनंद मिळतो. 5 / 6जेव्हा तुम्ही कुणालाही मिठीत घेतो तेव्हा समोरची व्यक्ती स्वत:ला सुरक्षित समजू लागते. तसेच तिचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. 6 / 6जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना मिठीत घेतात, तेव्हा शरीरातील एनर्जीचे आदान-प्रदान होते. त्यामुळे एकमेकांमधील नाते भक्कम होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications